सकारात्मक वातावरणाच्या निर्मितीसाठी ऑनलाईन संगीत संध्या, ५ हजाराहून अधिक प्रेक्षकांनी लुटला आनंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 12:30 PM2021-06-07T12:30:07+5:302021-06-07T12:30:13+5:30

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा नवा उपक्रम, संगीतातून सकारात्मक संदेश

Online music evening to create a positive atmosphere, more than 5,000 spectators enjoyed! | सकारात्मक वातावरणाच्या निर्मितीसाठी ऑनलाईन संगीत संध्या, ५ हजाराहून अधिक प्रेक्षकांनी लुटला आनंद!

सकारात्मक वातावरणाच्या निर्मितीसाठी ऑनलाईन संगीत संध्या, ५ हजाराहून अधिक प्रेक्षकांनी लुटला आनंद!

Next
ठळक मुद्देसोसायटीच्या विविध घटक संस्थांमधील ६५ हून अधिक शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला

पुणे: लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक वातावरण आणि निखळ आनंदाची निर्मिती करण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने (डीईएस) आगळ्या-वेगळ्या ऑनलाइन संगीत संध्येचे आयोजन केले होते. सळसळता उत्साह आणि आत्मविश्‍वास प्रदान करणार्‍या या कार्यक‘माचा पाच हजाराहून अधिक प्रेक्षकांनी आनंद लुटला.

दोन दिवस चाललेल्या या संगीत सभेचा शुभारंभ नांदीने आणि समारोप भैरवीने करण्यात आला. मनाचा उत्साह वाढवणार्‍या, हलक्या-ङ्गुलक्या आणि उडत्या चालीच्या गाण्यांचा समावेश होता. मराठी आणि हिंदी भाषेतील बालगीते, भावगीते आणि भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्याला जोड होती विषयानुरूप चित्रकलेच्या प्रात्यक्षिकांची आणि वाद्य वादनाची. नैराश्य, ताणतणाव आणि भीतीचे मळभ दूर करीत उत्तरोत्तर ही संगीत मैफिल रंगत गेली.

सोसायटीच्या विविध घटक संस्थांमधील ६५ हून अधिक शिक्षकांनी या  कार्यक्रमात सहभाग घेतला. संगीत आणि चित्रकला शिक्षकांनी गेल्या महिन्यापासून तयारी करून घेतली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेच्या पदाधिकार्‍यांना व्यक्त होण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले. प्रत्येकाने या संधीचा मनसोक्त आनंद लुटला आणि आपल्या कलाविष्कारातून कलारसिकांना मंत्रमुग्ध केले.
 
या वेळी बोलताना सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले म्हणाले, ‘संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या कल्पनेतून सन २०१४ पासून संगीत संध्या कार्यक्रम सुरू केला. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम करता आला नाही. यावर्षी संकटावर मात करीत डीईएस परीवाराने एकत्र येत कार्यक्रम निर्मितीचे शिवधनुष्य पेलले. चित्रपट, नाटक, संगीत, चित्रकला आदी माध्यमातून होणारे मनोरंजन आणि मिळणार्‍या निखळ आनंदाला आपण सर्व जण दीड वर्षांपासून मुकलो होतो. या कार्यक्रमामुळे सकारात्मकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल असा विश्‍वास वाटतो.

 

Web Title: Online music evening to create a positive atmosphere, more than 5,000 spectators enjoyed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.