ऑनलाइन जगात वावरताना महिलांनी जागरुक राहावे: भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:41+5:302021-03-13T04:17:41+5:30

येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात, लैंगिक अत्याचार निवारण समिती व विद्यार्थिनी मंच या विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ...

In the online world, women need to be aware: Bhagwat | ऑनलाइन जगात वावरताना महिलांनी जागरुक राहावे: भागवत

ऑनलाइन जगात वावरताना महिलांनी जागरुक राहावे: भागवत

Next

येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात, लैंगिक अत्याचार निवारण समिती व विद्यार्थिनी मंच या विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऑनलाइन ‘जागतिक महिला दिन’ कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘ऑनलाइन सेफ्टी फॉर वूमन’ या विषयावर मार्गदर्शन करताना भागवत बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे होते. यावेळी व्यासपीठावर लैंगिक अत्याचार निवारण समितीच्या चेअरमन प्रा. डॉ. एच. एस. कारकर, कला व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब सांगळे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. के. जी. कानडे म्हणाले, ‘शिक्षणाचा अभाव, आर्थिकदृष्ट्या परावलंबित्व, पारंपरिक चालीरिती, पुरुषाची अधिकारशाही या गोष्टीमुळे महिलांना योग्य सन्मान मिळत नाही. म्हणून महिलांनी अर्थदृष्ट्या स्वावलंबी होणे काळाची गरज आहे, तरच स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने सन्मानाची वागणूक मिळेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एच. एस. कारकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. सीमा चव्हाण यांनी मानले.

Web Title: In the online world, women need to be aware: Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.