महाळुंगेत ऑनलाइन योग शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:45+5:302021-05-26T04:11:45+5:30
शिबिरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त विविध सूक्ष्मयोग आसनांचे, प्राणायामांचे तसेच जलनेती शुद्धीक्रियेचे कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले. कोणत्याही व्यक्तीला ...
शिबिरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त विविध सूक्ष्मयोग आसनांचे, प्राणायामांचे तसेच जलनेती शुद्धीक्रियेचे कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले. कोणत्याही व्यक्तीला सहज करता येणाऱ्या खांद्याच्या हालचाली, कंबरेच्या हालचाली, हस्तउत्तानासन, हस्तपादासन, एकहस्त कटीचक्रासन, अर्धचक्रासन, वज्रासन , शशांकासन, अद्वासन, तीर्थक भुजंगासन, सरल मत्स्यासन, शवासन, प्रणायामात- सूर्यानुलोम-विलोम, सूर्यभेदन, भस्रिका, उज्जयी प्राणायाम, दीर्घश्वसन, जलनेती, तसेच इतर शरीरशुद्धीक्रिया आदींचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
या वेळी योगशिक्षक उद्योजक पंकज महाळुंगकर, प्रा. सीमा महाळुंगकर, मोहिनी आवटे, प्रिया महाळुंगकर, ललिता महाळुंगकर, डॉ. ज्योती पानसंबळ, शासकीय अधिकारी शुभांगी माने, स्वप्नील काळोखे, ग्रामविकास अधिकारी परासुर, विजयानंद आवटे,निरामयच्या केंद्रप्रमुख विद्या आहेरकर, संचालिका आशा भट्ट, राम काकडे, डॉ.सतीश बापट, सविता स्वामी, रविना कुलकर्णी, आरती मनूरकर, डॉ. नीता पद्मावत, डॉ. अर्चना मुदखेडकर, डॉ. मीनाक्षी रेड्डी, पल्लवी चौधरी, शीतल साडेगावकर आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : २५ महाळुंगे योगा
फोटो ओळी : ऑनलाईन योग शिबिरात सहभागी शिबिरार्थी.