पुणे शहरातील फक्त दहा टक्के गतिरोधक शास्त्रीय पध्दतीने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 12:27 PM2019-06-19T12:27:12+5:302019-06-19T12:32:01+5:30

या गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघात होत आहे...

Only 10 percent speed breakers of the city's with correct plan | पुणे शहरातील फक्त दहा टक्के गतिरोधक शास्त्रीय पध्दतीने

पुणे शहरातील फक्त दहा टक्के गतिरोधक शास्त्रीय पध्दतीने

googlenewsNext
ठळक मुद्दे गतिरोधक तयार करण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मार्गदर्शक तत्व समिती गतिरोधकांमुळे  दुचाकी स्वरांना पाठ दुखी आणि मणक्याचे आजार गतिरोधकांचे अनेक प्रस्ताव कागदावरच

- माऊली शिंदे- 

पुणे : शहरामध्ये २ हजार ६०० पेक्षा जास्त गतिरोधक आहेत. यापैकी फक्त दहा टक्के गतिरोधक पालिका आणि पोलिसांच्या परवानगीने बनवले आहेत. इतर गतिरोधक अशास्त्रीय पध्दतीने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघात होत आहे.
पालिकेने शहरातील विविध रस्त्यावर गतिरोधक तयार करण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची गतिरोधक धोरण मार्गदर्शक तत्व समिती तयार केली आहे. ही समिती गतिरोधकांच्या प्रस्तावावर निर्णय घेते. इंडियन कॉंग्रेस रोडच्या नामांकनानुसार शास्त्रीयपध्तीचे गतिरोधक असावे. या नामांकनामध्ये गतिरोधकांची उंची आणि लांबी नमूद केलेली आहे. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारणे बंधनकारक असते.
 शहरामधील विविध रस्त्यावर गतीरोधक तयार करण्याची मागणीचे प्रस्ताव या समितीमध्ये सादर केले जातात. त्यानंतर समिती गतिरोधकाबाबत निर्णय घेते. मात्र, गेल्या तीन वर्षामध्ये या समितीच्या बैठका झाल्या नाही. यामुळे गतिरोधकांचे अनेक प्रस्ताव कागदावरच आहे. गतीरोधक तयार करण्यासाठी मान्यता मिळत नसल्याने. राजकीय कार्यकर्ते आणि नागरीक स्वत: अशास्त्रीय पध्दतीने गतिरोधक तयार केले आहे. या अशास्त्रीय गतिरोधकांमुळे  दुचाकी स्वरांना पाठ दुखी आणि मणक्याचे आजार होऊ लागले आहेत. तसेच गाडीचे नुकसान होत आहे. 
काही ठिकाणी पिवळे आणि काळे रबरी गतिरोधक तयार करण्यात आले आहे. हे रबरी गतिरोधक काही महिन्यामध्ये तुटताय. त्यानंतर रस्त्यावर फक्त नट बोल्ट राहतात. या नटबोल्ट वरून वाहन गेल्यानंतर चाक पक्चंर होतात. गतीरोधकांमुळे अपघात होत आहे. महापालिकेची गतिरोधक धोरण मार्गदर्शक तत्व समितीच्या बैठका होत नाही. गतिरोधकांबाबत निर्णय घेतले जात नाही. यामुळे या समितीच्या सदस्या कनिझ सुखराणी यांनी या समितीचा राजीनामा दिला आहे.
............
गतिरोधक धोरण मार्गदर्शक तत्व समितीच्या बैठका वेळेवर होत नाही. ऐनवेळी बैठका रद्द केल्या जातात. यामुळे शहरातील गतिरोधकांबाबत निर्णय घेतला जात नाही. ही समिती फक्त नाममात्र राहिली आहे. समितीचे कामकाज होत नसल्याने नागरीक स्वत: अशास्त्रीय पध्दतीने गतीरोधक तयार करतात. ज्यामुळे अपघातचे प्रमाण वाढत आहे. ज्या उद्देशासाठी समितीची स्थापना केली आहे. ते उदिष्ट पुर्ण होत नसल्याने मी या समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा आयुक्तांकडे  दिला आहे.  कनिझ सुखराणी, नागरी चेतना मंच, सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: Only 10 percent speed breakers of the city's with correct plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.