कुकडी प्रकल्पात फक्त १७.१६ टक्के पाणी
By admin | Published: April 12, 2017 03:59 AM2017-04-12T03:59:44+5:302017-04-12T03:59:44+5:30
उत्तर पुणे जिल्ह्याबरोबरच नगर जिल्ह्यालाला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये अवघा १७.१६ टक्के पाणीसाठा उरला आहे. यातील फक्त डिंभे धरणातून
घोडेगाव : उत्तर पुणे जिल्ह्याबरोबरच नगर जिल्ह्यालाला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये अवघा १७.१६ टक्के पाणीसाठा उरला आहे. यातील फक्त डिंभे धरणातून उजव्या व डाव्या कालव्याव्दारे ७७७ क्युसेक्सने पाणी सुरू आहे. वाढता उन्हाळा व पाण्याची टंचाई लक्षात घेता शेतक-यांनी पाण्याचा अंदाज घेवून पिके घेण्याची आवश्यकता आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालूक्यांबरोबरच नगर जिल्हयातील श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, पारनेर तालूक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पात अल्पपाणी साठा राहिला आहे.
पावसाळयाला अजून दोन ते अडिच महिने राहिले असताना सध्याच्या कडक उन्हाळयामुळे पाण्याची टंचाई वाढली आहे तसेच धरणांमधील पाणीसाठा देखील झपाट्याने कमी होत आहे. अजून पिण्याच्या पाण्याची तीव्रता सर्वत्र जाणवत नसली तरी मे महिन्यात
सधन भागातील गावांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे. (वार्ताहर)
कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणात २७.९१ टक्के तर येडगांव मध्ये १९.५५ टक्के, माणिकडोह ७.०३ टक्के, वडज २०.२० टक्के, पिंपळगांव जोगे धरणात ६.४९ टक्के उपलब्ध पाणीसाठा आहे. एकुण आकडेवारी पाहिली असता कुकडी प्रकल्पात १७.१६ टक्के पाणी म्हणजेच ५.२३ टिएमसी पाणी आहे. मागिल वर्षी कुकडी प्रकल्पात अवघा ५ टक्के पाणीसाठा होता. मागिल वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाणी असले तरी भविष्यातील पावसाचा अंदाज पहाता यावर्षी टंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची वर्तवली जात आहे.