केवळ १८० व्हिडीओंना मान्यता
By admin | Published: February 16, 2017 03:37 AM2017-02-16T03:37:58+5:302017-02-16T03:37:58+5:30
शहर व उपनगरांमध्ये अनेक उमेदवारांनी एलईडी स्क्रीन तसेच माध्यमांमधून प्रचाराची मोहीम उघडली आहे. मात्र, निवडणूक कार्यालयाकडे
पुणे : शहर व उपनगरांमध्ये अनेक उमेदवारांनी एलईडी स्क्रीन तसेच माध्यमांमधून प्रचाराची मोहीम उघडली आहे. मात्र, निवडणूक कार्यालयाकडे बुधवारपर्यंत केवळ १८० व्हिडीओ सीडींना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे काही उमेदवारांकडून मान्यता न घेताच प्रचाराचे व्हिडीओ दाखविले जात असल्याचे चित्र आहे.
निवडणूक कार्यालयामध्ये प्रचाराच्या जाहिराती, व्हिडीओ मान्यतेसाठी स्वतंत्र समिती तयार करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना व्हिडीओच्या माध्यमातून प्रचार करायचा आहे, त्यांना संबंधित व्हिडीओची सीडी मान्यतेसाठी समितीकडे सादर करावी लागते. या समितीतील सदस्य संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याला मान्यता देण्याबाबत निर्णय घेतात. व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला समितीची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
अशी परवानगी न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. असे असले, तरी शहर व उपनगरांतील उमेदवारांकडून त्याचे पालन होत असल्याचे दिसत नाही. समितीने बुधवारपर्यंत केवळ १८० सीडी पाहून त्यातील बहुतेक व्हिडीओंना मान्यता दिली आहे. त्यामध्ये राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार, तसेच अपक्षांच्याही व्हिडीओंचा समावेश आहे.
(प्रतिनिधी)