पवना धरणात फक्त २२.१८ टक्के पाणी; पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 02:47 PM2024-06-07T14:47:43+5:302024-06-07T14:48:02+5:30

जूनचा पहिला आठवडा सुरू आहे. मावळ तालुक्यातील पवना सद्य:स्थितीला २२.१८ धरणात टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा बाष्पीभवन आणि अन्य कारणे गृहीत धरल्यास जूनपर्यंत पुरवता येऊ शकतो, असे पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी सांगितले...

Only 22.18 percent water in Pavana Dam; The hanging sword of water cut on Pimpri-Chinchwadkar | पवना धरणात फक्त २२.१८ टक्के पाणी; पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

पवना धरणात फक्त २२.१८ टक्के पाणी; पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

पवनानगर (पुणे) : मावळ तालुक्यासाठी वरदान असलेल्या पवना धरणातील जलसाठा घटू लागला आहे. धरणात आजमितीस ५३.४४ दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ २२.१८ टक्के पाणीसाठा आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात अपुऱ्या, कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला, तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार असणार आहे.

जूनचा पहिला आठवडा सुरू आहे. मावळ तालुक्यातील पवना सद्य:स्थितीला २२.१८ धरणात टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा बाष्पीभवन आणि अन्य कारणे गृहीत धरल्यास जूनपर्यंत पुरवता येऊ शकतो, असे पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी सांगितले. परंतु, उन्हाची तीव्रता, धरणातून होणारी गळती अशा कारणांमुळे हा जलसाठा लवकरही संपू शकतो, अशी भीती आहे.

धरणातील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर)

८४.५८ - एकूण पाणीसाठा

५३.४४ उपयुक्त पाणीसाठा

३१.४४ मृत जलसाठा

Web Title: Only 22.18 percent water in Pavana Dam; The hanging sword of water cut on Pimpri-Chinchwadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.