एका वर्गात केवळ २५ विद्यार्थ्यांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:59+5:302020-12-14T04:26:59+5:30
बारामती: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आले. तेव्हापासून सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. अखेर ...
बारामती: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आले. तेव्हापासून सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. अखेर शैक्षणिक वर्ष चार महिने लांबणीवर गेल्यावर राज्य सरकारने २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. शिक्षकांची कोरोना चाचणी करून नुकतीच काही दिवसांपुर्वी क्रिएटिव्ह शाळेची घंटा वाजली. शाळेत एका वर्गात २५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून नियमांची काटेकोरपणे अंमजबजावणी करण्यात येत आहे.
कोरोना पासून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी य नियोजन शिक्षकांनी केले.तसेच अभ्यास बरोबरच आरोग्यची काळजी घेण्यात आली आहे. शाळेत विद्यार्थी येताच त्यांना पूर्णपणे सॅनि टायझर करून थर्मल गन व ऑक्सी मीटरच्या सा''''ाने विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.त्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.यावेळी एका वर्गात २५ विद्यार्थी स्वतंत्र बाकावर बसून अध्यापनाचे काम सुरू करण्यात आले.
आज अखेर शाळेत येण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ६५ टक्केवर गेले आहे.राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार दररोज केवळ चार तास एका होणार आहेत. उर्वरित विषयाची तयारी आॅनलाईन पद्धतीने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे ,अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र साळुंखे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना निर्जंतुक करून त्यांनी मास्क लावला की नाही, याची पाहणी करून वर्गात प्रवेश दिला जातो. संस्थेचे संस्थापक प्रा.बाळासाहेब घाडगे व प्रा. शेषराव काळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कोरोना विषयी संवाद साधला. आवश्यक दक्षता तसेच, नियमावली, समुपदेशन करून शाळेला सुरुवात झाली.
———————————
क्रिएटिव्ह शाळेत विद्यार्थ्यांची तपासणी करुन वर्गात प्रवेश देण्यात आला.
१३१२२०२०बारामती— ०४
——————————————