मुलांंबाबतच्या गुन्ह्यात केवळ २८ टक्क्यांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:13 AM2021-09-22T04:13:51+5:302021-09-22T04:13:51+5:30

स्टार ११९७ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलांबाबतचे पुणे शहरात गेल्या वर्षी ६६५ गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, ...

Only 28 per cent convicted of child offenses | मुलांंबाबतच्या गुन्ह्यात केवळ २८ टक्क्यांना शिक्षा

मुलांंबाबतच्या गुन्ह्यात केवळ २८ टक्क्यांना शिक्षा

Next

स्टार ११९७

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अल्पवयीन मुलांबाबतचे पुणे शहरात गेल्या वर्षी ६६५ गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या गुन्ह्यांचा तपास अतिशय मंद गतीने होत असून, सध्या ११५३ गुन्हे हे तपासावर प्रलंबित आहेत.

नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या २०२० च्या अहवालानुसार पुणे शहरात २०२०मध्ये २०१९च्या तुलनेत मुलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये घट दिसून आली आहे. त्याच वेळी अशा गुन्ह्यांचा तपास अतिशय मंदगतीने होत आहे. २०१९ मध्ये दाखल झालेल्या ९४८ गुन्ह्यांपैकी ४८८ गुन्ह्यांचा तपास २०२०च्या सुरुवातीला प्रलंबित होता. त्यात वर्षभरात आणखी ६५५ गुन्ह्यांची भर पडली. वर्षभरात ११५३ गुन्ह्यांचा तपास करणे आवश्यक होते. मात्र, त्यापैकी केवळ २७९ गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. दोषारोपपत्र दाखल करण्याचे हे प्रमाण केवळ ४० टक्के इतके आहे. देशातील ३४ मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाण अन्य शहरांच्या मानाने खूपच कमी आहे.

न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांपैकी ९८ टक्के खटले हे गेल्या वर्षी प्रलंबित राहिले आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे न्यायालयात खटल्यांची सुनावणी होऊ शकली नाही. ज्या खटल्यांची सुनावणी झाली, त्यापैकी ४३ खटल्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटले असून केवळ १९ खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा लागली आहे. शिक्षा लागण्याचे प्रमाण २८ टक्के इतके आहे. सध्या न्यायालयात ४ हजार ९४९ खटले प्रलंबित आहेत.

मुलांबाबतचे गुन्हे

२०१८ - ८७७

२०१९ - ९४८

२०२० - ६६५

.......

खुन - ५

खुनाचा प्रयत्न २

पळवून नेणे - ४३२

लैंंगिक अत्याचार २११

Web Title: Only 28 per cent convicted of child offenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.