Good news पुण्यातील कंटेनमेंट झोन ची संख्या घटली! पॉझिटीव्हिटी रेटही ५.५१%

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 11:57 AM2021-06-04T11:57:25+5:302021-06-04T12:00:11+5:30

रोज साधारण ४५० रुग्णांची पडतेय भर

Only 28 micro containment zones in Pune, Positivity rate down to 5.51% | Good news पुण्यातील कंटेनमेंट झोन ची संख्या घटली! पॉझिटीव्हिटी रेटही ५.५१%

Good news पुण्यातील कंटेनमेंट झोन ची संख्या घटली! पॉझिटीव्हिटी रेटही ५.५१%

Next

अगदी काही आठवड्यांपूर्वी सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढी साठी ओळखल्या गेलेल्या पुणे शहरात रुग्ण संख्यां चांगलीच आटोक्यात आली आहे. याचाच थेट परिणाम म्हणजे पुणे शहरातील ,कंटेनमेंट झोनची संख्या फक्त २८ वर आली आहे. याबरोबरच पॉझिटीव्हिटी रेट ५.५१% वर आला आहे. 

पालकमंत्री अजित पवार यांचा उपस्थिती मध्ये होणाऱ्या आढावा बैठकीसाठी महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या प्रेझेंटशन मधून ही दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. शहरात मायक्रो कंटेनमेंट झोनची संख्या काहीच महिन्यांपूर्वी १०० पेक्षा जास्त होती. आता मात्र ही अगदी कमी झालेली दिसत आहे. पाच पेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या भागाला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येते. या भागातील नागरिकांचा वावरावर निर्बंध लादले जातात. सध्या पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये ६ इमारती,१० सोसायट्या, आणि इतर १२ असे केवळ २८ कंटेनमेंट झोन आहेत.

याबरोबरच दिलासादायक ठरलेली दुसरी महत्वाची बाब म्हणजे सध्या शहरात कोरोना चे ५२१३ रुग्ण आहेत. तर एकुण पॉझिटीव्हिटी रेट ५.५१% वर आला आहे. त्यामुळे शहराला काही दिलासा मिळतो का आणि आणखी अनलॉक ची परवानगी मिळते का ते पाहावे लागेल. 

Web Title: Only 28 micro containment zones in Pune, Positivity rate down to 5.51%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.