पुण्यात फक्त 3क्क्क् भाडेकरू!
By admin | Published: December 10, 2014 12:01 AM2014-12-10T00:01:18+5:302014-12-10T00:01:18+5:30
व्यावसायिक अथवा रहिवासी भाडेकराराची नोंदणी करणो सुलभ व्हावे यासाठी मुद्रांक विभागाने ई-नोंदणीची सुविधा देऊनही शहरातील केवळ 2 हजार 839 नागरिकांनी भाडेकराराची नोंदणी केली
Next
विशाल शिर्के ल्ल पुणो
व्यावसायिक अथवा रहिवासी भाडेकराराची नोंदणी करणो सुलभ व्हावे यासाठी मुद्रांक विभागाने ई-नोंदणीची सुविधा देऊनही शहरातील केवळ 2 हजार 839 नागरिकांनी भाडेकराराची नोंदणी केली
असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता भाडेकरारासाठी मुद्रांक शुल्क विभागच विविध संस्था अथवा गटांच्या दारी जाणार असून, मागणीप्रमाणो ही सुविधा संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लिव्ह अॅण्ड लायसेन्स दस्तांची (भाडेकरार) नोंदणी करणो रेंट कंट्रोल अॅक्टनुसार बंधनकारक आहे. भाडेकरारासाठी यापूर्वी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांकडून तुलनेने दस्ताची नोंदणी करण्याचे प्रमाण अत्यल्प होते. नागरिकांना दस्ताची नोंदणी करणो सोयीचे जावे यासाठी मुद्रांक कार्यालयातर्फे डिसेंबर 2क्13 रोजी ई दस्त नोंदणीस सुरुवात केली. मात्र भाडेसेवामध्ये अग्रेसर असलेल्या मुंबई व पुणो या शहरांतील स्थिती उत्साहवर्धक नसल्याचे समोर आले आहे. वर्षभरात शहरातील 2 हजार 839 व मुंबईतील 88 नागरिकांनी भाडेकराराची ई-दस्त नोंदणी केली आहे.
रहिवासी अथवा व्यावसायिक जागेचा भाडेकरार हा मालक व भाडेकरू यांसाठी महत्त्वाचा मानला जातो. मालकी हक्काबाबत वाद होऊ नये यासाठी जागेच्या मालकाला, तर मालकाने मनमानीपणा करू नये, यासाठी भाडेकरूसाठीदेखील हा करार महत्त्वाचा मानला जातो; मात्र अनेकदा परस्पर विश्वासावर भाडेकरूंना जागा दिली जाण्याचे प्रमाण रहिवासी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर आहे.
बहुतांश प्रकरणांमध्ये ठराविक रकमेच्या मुद्रांकावर करार केला जातो. मात्र, त्याची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे केली जात नाही. त्यामुळे मुद्रांक पेपरवर लिखापडी करूनही नोंदणीअभावी त्या कराराचे कायदेशीर महत्त्व शून्य असते. त्या पाश्र्वभूमीवर मुद्रांक विभागातर्फे सहकारी गृहनिर्माण संस्था अथवा गटांना ई-रजिस्ट्रेशनची सुविधा त्यांच्या कार्यालयात अथवा सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातूनही अशा पद्धतीच्या सुविधा नागरिकांना देण्यात येणार
आहेत.
ई नोंदणीसाठी संगणक, इंटरनेट जोड, थंब स्कॅनर, बायोमेट्रिक डिव्हाईस, वेब कॅमेरा व प्रिंटरची आवश्यकता असते. दस्ताची नोंदणी फी व मुद्रांक शुल्क ई पेमेंटद्वारे भरता येते. गेल्या वर्षीपासून मात्र भाडेकरूंची माहिती देण्याच्या प्रमाणात वाढ
झाली आह़े
घरमालकांनी पोलिसांना जरी भाडेकरूंची माहिती दिली, तरी त्यासंबंधी भाडेकरार केला जात नसल्याचे दिसून येत आह़े
भाडय़ाने घर घेऊन त्याचा वापर अतिरेकी कारवाया करण्यासाठी करण्यात आल्याच्या घटनांनंतर पुणो शहर पोलीस दलाने घर भाडय़ाने दिल्यास त्याची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देणो बंधनकारक केले आह़े त्यानुसार जानेवारी ते ऑक्टोंबर 2क्14 या काळात पुणो शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 45 हजारहून अधिक घरमालकांनी त्यांच्या भाडेकरूंची नोंद शहर पोलीस दलाकडे केली आह़े यामध्ये घरमालक व त्याचे घर, ज्यांना भाडय़ाने देण्यात आले आहे, त्यांचे फोटो, यापूर्वी राहण्याचा पत्ता, संपर्क क्रमांक अशी माहिती दिली जात़े ज्यांनी अशी माहिती दिली नाही व त्यांच्या घराचा गैरवापर झाला, अशा घरमालकांवर यापूर्वी गुन्हेही दाखल झाले आहेत़
रहिवासी अथवा व्यावसायिक भाडेकराराची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपये नोंदणी फी आकारली जाते, तर कराच्या प्रत्येक पानाला 2क् रुपये आकारले जातात. हा करारही पाच पानांपेक्षा जास्त नसतो. भाडेकराराचे कायदेशीर महत्त्व वाढावे यासाठी कराराची नोंदणी करणो आवश्यक आहे.
- चिंतामण भुरकुंडे
उपमहानिरीक्षक, नोंदणी
व मुद्रांक विभाग