मतदान स्लिपांचे केवळ ४० टक्के वाटप
By admin | Published: February 20, 2017 02:28 AM2017-02-20T02:28:59+5:302017-02-20T02:28:59+5:30
शहरात घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग ७, १४ आणि १६ मधील २ लाख २० हजार मतदारांपर्यंत मतदान स्लिपावाटपाचे काम सुरू झाले असून
पुणे : शहरात घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग ७, १४ आणि १६ मधील २ लाख २० हजार मतदारांपर्यंत मतदान स्लिपावाटपाचे काम सुरू झाले असून, रविवारपर्यंत केवळ ४० टक्के स्लिपा वाटप करण्यात आल्या आहेत़
रविवारअखेर अजूनही असंख्य गठ्ठे तसेच पडून असून जे कर्मचारी या याद्या घेण्यासाठी आले नाहीत, त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. दुसरीकडे मतदान स्लिपा वाटपासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांची सलग स्लिपा नसल्याने पत्ता शोधताना दमछाक होत आहे़ तीन प्रभागांमध्ये एकूण २९१ मतदान केंद्रे असून त्यापैकी २०१ मतदान केंद्रांतर्गतच्या स्लिपा वाटपासाठी कर्मचाऱ्यांनी नेल्या आहेत़ मतदान स्लिपा वाटपासाठी २१६ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून सोमवारी आणखी कर्मचारी नेमून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत स्लिपा पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे़ कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ७० कर्मचारी याद्या घेण्यास फिरकलेले नाही़ त्यामुळे हे गठ्ठे तसेच पडून आहेत़ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना लावून हे काम पूर्ण करावे लागणार आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
मतदान केंद्रावर जाणाऱ्या मतदान केंद्राधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांना सोमवारी साहित्य वाटप करण्यात येणार आहे़ हे वाटप करताना काय काय काळजी घ्यावी, कोणकोणते साहित्य त्यांना द्यावे, त्याचे कशा पद्धतीने गठ्ठे तयार करून ठेवण्यात आले आहेत, याची माहिती घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना रविवारी देण्यात आली़