आरटीईचे केवळ ५० टक्के प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:36+5:302021-07-08T04:09:36+5:30

राज्यातील ९ हजार ४३२ जपानमधील ९६ हजार ६८४ जागांसाठी २ लाख २२ हजार ५८३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ...

Only 50% admission to RTE | आरटीईचे केवळ ५० टक्के प्रवेश

आरटीईचे केवळ ५० टक्के प्रवेश

Next

राज्यातील ९ हजार ४३२ जपानमधील ९६ हजार ६८४ जागांसाठी २ लाख २२ हजार ५८३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने प्रवेशासाठी निवड करण्यात आले. आतापर्यंत ४० हजार ७३३ विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश मिळाला असून ३८ हजार ९६९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.

कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेस उशीर झाला आहे. त्यात काही शाळांकडून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आत्तापर्यंत केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला आहे. शिक्षण विभागाने ९ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. परंतु, दोन दिवसांत उर्वरित प्रवेश पूर्ण होणार नसल्याने शिक्षण विभागाला आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Only 50% admission to RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.