रविवारी दिवसभरात केवळ ७०९ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:54+5:302021-05-24T04:10:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाबाधितांची संख्या या आठवड्यात चौथ्यांदा एक हजाराच्या आत आली असून, रविवारीही केवळ ७०९ कोरोनाबाधितांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या या आठवड्यात चौथ्यांदा एक हजाराच्या आत आली असून, रविवारीही केवळ ७०९ कोरोनाबाधितांची झाली आहे. तर २ हजार ३२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ रविवारी पुण्यातील सक्रिय रूग्णसंख्या १० हजारापर्यंत आली असून, सध्या शहरात १० हजार ६७६ सक्रिय रुग्ण आहेत़
दरम्यान आज तपासणी करून घेणाऱ्यांची संख्याही १० हजाराच्या आत असून, आज दिवसभरात ९ हजार ५६ जणांनी तपासणी करून घेतली आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ७.८३ टक्के इतकी आहे़ दिवसभरात ६० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २१ जण पुण्याबाहेरील आहे. आजचा शहरातील मृत्यूदर हा १.७१ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ५ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर गंभीर रूग्णसंख्याही १ हजार २९१ इतकी आहे़ शहरात आत्तापर्यंत २४ लाख ३६ हजार ४४६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६५ हजार ६२५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ४६ हजार ९४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आतापर्यंत शहरात ८ हजार ७ जणांचा मृत्यू झाला आहे़
-----------
महिन्याभरात सक्रिय रुग्ण संख्या ३९ हजार ६४९ ने कमी
शहरात कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी होताना दिसत असून, गेल्या महिनाभरात शहरातील कोरोनाबाधितांची सक्रिय संख्या तब्बल ३९ हजार ६४९ ने कमी झाली आहे. २३ एप्रिल रोजी शहरात ५० हजार ३२५ रुग्ण सक्रिय होते.