पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात अचानक उद्भवलेल्या आजारांकरिता अवघी नऊ लाखांची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 08:12 PM2020-03-10T20:12:50+5:302020-03-10T20:23:51+5:30

साथीच्या रोगांच्या नियंत्रणाकरिता तोकडा निधी

Only 9 lakhs provisional fund in municipal corporation budget | पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात अचानक उद्भवलेल्या आजारांकरिता अवघी नऊ लाखांची तरतूद

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात अचानक उद्भवलेल्या आजारांकरिता अवघी नऊ लाखांची तरतूद

googlenewsNext
ठळक मुद्दे कोरोनासारखे आजार व साथीच्या आजारांचा वाढता फैलाव लक्षात घेता भरीव निधीची आवश्यकता

पुणे : कोरोना विषाणूने बाधित झालेले रुग्ण पुण्यामध्ये आढळून आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, पालिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये अचानक उद्भवलेल्या आजारांमध्ये औषधे व तदनुषंगिक बाबी खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते. या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये अवघी नऊ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता असलेल्या निधीलाही कात्री लावली असून १ कोटी ८० लाखांची तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे. अत्यावश्यक गोष्टींसाठी तोकडी तरतूद केली जात आहे. २०१६-१७ मध्ये ९ लाख ९२ हजार, २०१७-१८ मध्ये शून्य, २०१८-१९ मध्ये शून्य, २०१९-२० मध्ये ८ लाखांची तरतूद केलेली होती. यंदा त्यामध्ये अवघे एक लाख रुपये वाढविले आहेत. 
दिवसेंदिवस साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असतानाच त्यावरील उपाययोजनांसाठी दरवर्षी आर्थिक तरतूद केली जाते. आयुक्तांनी या योजनेसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये केली होती. त्याला स्थायी समितीच्या अंदाजपत्रकामध्ये कात्री लावली असून १ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद ठेवली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात ही तरतूद काही प्रमाणात वाढविलेली असली तरी ती अत्यंत कमी असल्याचेही दिसत आहे. 
स्थायी समितीच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात २ कोटी ६ लाख ८ हजार ८०६ रुपये, २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात १ कोटी ३७ लाख ३५ हजार २२२ रुपये, तर २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात १ कोटी २९ लाख ३८ हजार ९७७, तर २०१९-२० करिता १ कोटी ६० लाखांची तरतूद केलेली होती. यामध्ये यंदा २० लाख वाढविले असले तरी आयुक्तांनी सुचविलेल्या दोन कोटींच्या निधीला २० लाखांनी कात्री लावली आहे. कोरोनासारखे आजार व साथीच्या आजारांचा वाढता फैलाव लक्षात घेता भरीव निधीची तरतूद आवश्यक असतानाही त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

Web Title: Only 9 lakhs provisional fund in municipal corporation budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.