निरपेक्ष मानवताच देशाला संकटातून बाहेर काढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:04 AM2021-05-04T04:04:04+5:302021-05-04T04:04:04+5:30

डॉ. अभिजित वैद्य : १०२ रिक्षा रुग्णवाहिका उपक्रमास सुरुवात डॉ. अभिजित वैद्य : १०२ रिक्षा रुग्णवाहिका उपक्रमाला सुरुवात पुणे ...

Only absolute humanity will get the country out of the crisis | निरपेक्ष मानवताच देशाला संकटातून बाहेर काढेल

निरपेक्ष मानवताच देशाला संकटातून बाहेर काढेल

Next

डॉ. अभिजित वैद्य : १०२ रिक्षा रुग्णवाहिका उपक्रमास सुरुवात

डॉ. अभिजित वैद्य : १०२ रिक्षा रुग्णवाहिका उपक्रमाला सुरुवात

पुणे : संकटकाळात सामाजिक भान बाळगून मदतीचा हात पुढे करणे हे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य आहे, असे मत आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले. या संकटातून देशाला दोनच एक निरपेक्ष मानवता आणि राजकीय परिवर्तनच वाचवू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

कामगार आणि महाराष्ट्र दिनाचे औैचित्य साधून आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १०२ रिक्षा रुग्णवाहिका म्हणून कार्यरत असणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ससून रुग्णालयासमोर या उपक्रमाचे उद्घाटन वैद्य यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

वैद्य म्हणाले, ''आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला १०२ रिक्षा रुग्णवाहिकेचा उपक्रम १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन ते संपूर्ण लॉकडाऊन २४ तास मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोनाग्रस्त जनतेच्या असहायतेचा फायदा उठवत रुग्णवाहिका, औषधांचा बाजार मांडला जात होता. तेव्हा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे हे कोविड योद्धे रिक्षाचालक निर्भयपणे जनतेच्या सेवेसाठी उभे राहिले.''

महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष, कष्टकरी पंचायतीचे नेते बाबा कांबळे म्हणाले की, ‘आरोग्य सेनेने आमच्या खांद्याला खांदा भिडवल्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी सुरू केलेली ही अभिनव सेवा खूप मोठे स्वरूप घेऊ शकली आहे. या सेवेची व्याप्ती वाढविण्याचा आमचा दोन्ही संघटनांचा मानस आहे.”

या कार्यक्रमाला आरोग्य सेनेच्या वतीने केंद्रीय समिती सदस्य डॉ. नितीन केतकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर कार्याध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, कुमार शेट्ये, मुराद काझी आदी उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पाच रिक्षा रुग्णवाहिकांवर उपक्रमाची माहिती आणि संपर्क मोबाईल क्रमांक असलेले स्टीकर चिकटवून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

चौकट -

गरजू रुग्णांनी या सेवेसाठी ९८५०४९४१८९ व ७८४१०००५९८ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

Web Title: Only absolute humanity will get the country out of the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.