एकुलत्या मुलाचे केले नेत्रदान
By admin | Published: June 10, 2017 02:10 AM2017-06-10T02:10:18+5:302017-06-10T02:10:18+5:30
मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल लागला. प्रथम श्रेणीत ६६ टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. या स्वप्नपूर्तीची
लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल लागला. प्रथम श्रेणीत ६६ टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. या स्वप्नपूर्तीची बातमी त्याने सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांना फोन करून दिली. आनंदाला पारावर उरला नव्हता. मोठा इंजिनिअर होऊन आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याची त्याच्यात जिद्द
होती. त्याच आनंदात घरी निघाला; पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. रस्त्यावर झालेल्या
एका अपघातात काळाने त्याची व त्याच्या कुटुंबीयांची सगळी स्वप्ने हिरावून घेतली.
चिंचवड येथील प्रणव (वय २०) हा नीळकंठ ऊर्फ उद्धव गावडे यांचा एकुलता होता़ तो पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होता. गुरुवारी त्याचा निकाल होता़ प्रथम श्रेणीत पास झाल्याची बातमी घरच्यांना फ ोनवर सांगून त्या आनंदातच तो घरी निघाला़ मात्र, रावेत येथे दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात प्रणव गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या अचानक जाण्याने गावडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीतही सामाजिक भान ठेवत आपल्या पोटच्या एकुलत्या मुलाचे नेत्रदान करण्याचा निर्णय गावडे कुटुंबीयांनी घेतला आणि समाजापुढे एक आगळावेगळा आदर्शच ठेवला.
प्रणव अतिशय मनमिळाऊ आणि सर्वांचाच लाडका होता़ त्याच्या मृत्यूची बातमी कळताच उद्धव गावडे यांचे भाचे अमित लांडगे यांनी जागृती सोशल फाउंडेशनच्या राम फु गे यांच्याशी संपर्क साधला. मुलाचे नेत्रदान करण्यासाठी गावडे
कुटुंबीय तयार होतील का? हा
प्रश्न त्यांच्यासमोर होता. गावडे कुटुंबीयांचे नातेवाईक डॉ. प्रशांत खैरे यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि उद्धव गावडे यांनी नेत्रदान करण्यास संमती दर्शवली.