उत्पन्नवाढीचा केवळ अंदाज

By admin | Published: February 17, 2015 01:29 AM2015-02-17T01:29:55+5:302015-02-17T01:29:55+5:30

स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात हे शाश्वत उत्पन्न राहणार नसले, तरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात अकराशे कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

The only estimation of yield | उत्पन्नवाढीचा केवळ अंदाज

उत्पन्नवाढीचा केवळ अंदाज

Next

पिंपरी : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात हे शाश्वत उत्पन्न राहणार नसले, तरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात अकराशे कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. एलबीटी उत्पन्नात दहा टक्के उत्पन्न वाढ गृहीत धरली आहे. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा प्रश्न निकाली न निघाल्याने मिळकतकर भरणा, शास्तीकर वसुली अपेक्षित होऊ शकली नाही. तरीही करसंकलन विभागाकडून १० टक्के उत्पन्नवाढ गृहीत धरली आहे.
मंदीचा परिणाम झाल्याने बांधकाम परवाना विभागात उत्पन्न वाढ होणार नाही. हे मान्य करून या विभागाकडून उत्पन्नवाढीची अपेक्षा बाळगलेली नाही. आगामी काळात त्या त्या विभागाकडून अपेक्षित उत्पन्न मिळेल, हे निश्चित नसले, तरी त्यांच्याकडून अधिक उत्पन्नाची अपेक्षा बाळगून केलेला २०१५-१६ चा ३६१५ कोटी ८९ लाखांचा अर्थसंकल्प हा फुगीर आकडेवारीचा असून, त्यावर आयुक्त राजीव जाधव यांची छाप दिसून येत नाही.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा मूळ ३६१६ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासनाकडून आयुक्त जाधव यांनी स्थायी समिती सभापती महेश लांडगे यांना सादर केला केला. आरंभीच्या १८४ कोटी ९० लाखांच्या शिलकी रकमेसह २३१५ कोटी ६६ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प, तसेच जेएनएनयूआरएमसह एकत्रित असा ३६१६ कोटींचा अर्थसंकल्प सादर करतेवळी आयुक्त म्हणाले की, या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचविलेली नाही. परंतु पुढील काळात पाणीपट्टीत वाढ करणे अनिवार्य ठरणारे आहे. समाविष्ट गावांतील विकासकामांसाठी २५ कोटींची भरीव तरतूद केली आहे. जमा रकमेच्या तपशिलाची माहिती देताना ते म्हणाले की, बांधकाम परवाना विभाग वगळता, एलबीटी, करसंकलन आणि भूमी-जिंदगी या विभागाकडून उत्पन्नवाढ अपेक्षित धरली आहे. गुंतवणुकीवरील व्याजापोटी ८० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. एलबीटीद्वारे ११०३ कोटींचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. पाणीपट्टीतून ६५ कोटी, अनुदान २१ कोटी, भांडवली जमा ४० कोटी अन्य विभागाकडील जमा ४१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. नोंदणी न झालेल्या ८१ हजार मिळकतींच्या माध्यमातून ४२५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. वास्तविक, तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या काळात गतवर्षी या मिळकतींचा शोध घेण्यात आला. आतापर्यंत त्या मिळकतींचे उत्पन्न वसूल होणे अपेक्षित असताना, या वर्षीच्या अर्थसंकल्पासाठी ते उत्पन्न गृहीत धरले आहे. उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध आहेत, तेथे उत्पन्न मिळविण्याचे प्रयत्न अयशस्वी होत असताना, उत्पन्नवाढीचे नवे स्रोत शोधण्याचे सूतोवाच केले जात आहे.
खर्च तपशिलात १२२१ कोटी महसुली खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. भांडवली खर्च १७९८ कोटी, कर्ज निवारण निधी १ कोटी, विकासनिधी ३० कोटी, वाहन घसारा निधी १ कोटी, अपंग कल्याणकारी योजना निधी २ कोटी, जेएनएनयूआरएम योजनेसाठी पालिकेचा हिस्सा ३८ कोटी, पीएमपीसाठी १२० कोटी, अनामत परताव्यापोटी २६४ कोटी, जेएनएनयूआरएमकरिता तरतूद १३८ कोटींच्या विकासकामांचा असा एकूण ३६१६ कोटींचा समावेश आहे.
क्षेत्रीय कार्यालयांना १५३ कोटी
पालिकेच्या ६ क्षेत्रीय कार्यालयांना विकासकामांसाठी १५३ कोटी ३१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयासाठी सरासरी प्रत्येकी २२ ते २५ कोटींची स्वतंत्र तरतूद केली आहे. त्यात ‘अ’साठी २६ कोटी ३९ लाख, ‘ब’ साठी २२ कोटी ३२ लाख, ‘क’साठी २७ कोटी २२ लाख, ‘ड’साठी २० कोटी ९४ लाख, ‘ई’साठी २९ कोटी ७१ लाख, ‘फ’साठी २६ कोटी ७३ लाख तरतूद आहे. (प्रतिनिधी)

४नगररचना विभाग भूसंपादनासाठी १०० कोटी
४स्वच्छ भारत अभियानासाठी ५० लाख
४ज्येष्ठ नागरिकांसाठी १ कोटीची तरतूद
४स्मार्ट सिटीसाठी ५० लाखांची तरतूद
४सहा ठिकाणी श्वान दफनभूमी सुविधा
४शहरी गरिबांसाठी योजना ७०० कोटी
४महापौर विकास निधीसाठी तीन कोटी
४महिला व बालकल्याण योजनांसाठी ३१ कोटी
४मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी ५ कोटी
४अपंग कल्याणकारी योजनांसाठी १३ कोटी
४अन्य कल्याणकारी योजनांसाठी ३९ लाख

४वायसीएममध्ये बहुमजली वाहनतळ, रात्र निवारा केंद्र
४प्राणिसंग्रहालय विस्तारीकरण
४पर्यटन विकासांसाठी ४२ कोटींची तरतूद
४भोसरीत साकारणार कुस्ती प्रशिक्षण केंद्र
४भोसरीत साकारणार मंडई
४शाळा इमारत बांधण्यासाठी ८ कोटींची तरतूद
४पिंपरी, डेअरी फार्म येथे उड्डाणपूल उभारणार
४भक्ती-शक्ती ते मुकाई चौक उड्डाणपूल साकारणार
४थेरगाव, पिंपरीत दवाखाना विस्तारीकरण
४सहा क्षेत्रीय कार्यालयांत गॅसदाहिनी
४कचरा विघटनासाठी बायो कंपोस्टर

४निगडीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा
४पिंपरीगावात छत्रपती शिवाजीमहाराज पुतळाउभारणी
४आळंदी फाटा येथे यंत ज्ञानेश्वर, नामदेव भेटीवर आधारित शिल्प
४आकुर्डीत संत तुकाराममहाराज जीवनावर आधारित शिल्प
४पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ साकारणार भीमसृष्टी

Web Title: The only estimation of yield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.