आजोबा लस घ्याल, तरच नातवाचं लग्न पाहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:08+5:302021-03-28T04:10:08+5:30
कवठे येमाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून दोन दिवस कोरोनाच्या ऑनलाइन तारखा आल्यानंतर लसीकरण करण्यात येत आहे. सकाळी ...
कवठे येमाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून दोन दिवस कोरोनाच्या ऑनलाइन तारखा आल्यानंतर लसीकरण करण्यात येत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच लसीकरणाला सुरुवात होते. शुक्रवारी ज्येष्ठांनी लस घेतली लसीकरणाचा हा पाचवा दिवस होता
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरणासाठी नाव नोंदणीची ही व्यवस्था आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची आधार कार्ड घेऊन आरोग्य केंद्रावर देण्याचे आव्हान वैद्यकीय अधिकारी नामदेव पानगे यांनी केले. आरोग्य सेविका प्रियंका लंघे, आशा स्वयंसेविका प्रमिला पिंगळे, सुजाता जाधव, सपना गोरडे, सुरेखा पुंडे हे लसीकरणाचे काम पहात आहेत.
लसीकरणानंतर वृद्धांचे समुपदेशनही केले जात आहे. आरोग्य विभागाचे वृद्धावर लक्ष केंद्रित केले आहे तालुक्यातील सर्वच वृद्धांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे त्यासाठी आरोग्य विभागाने विविध शक्कल लढविली या आहेत
--
फोटो क्रमांक : २७ कवठेयमाई कोरोना लसीकरणी
फोटोओळ.... कवठे येमाई (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेताना ज्येष्ठ नागरिक समवेत आरोग्यसेविका प्रियंका लंघे