महायुती लाडकी बहीण नावाने फक्त मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी; सुषमा अंधारे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 09:16 AM2024-11-19T09:16:33+5:302024-11-19T09:18:56+5:30
पुणे : लाडकी बहीण नावाने सध्या मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू असून नागरिकांची गोंधळलेली अवस्था झाली आहे. भावाने केलेल्या मदतीची ...
पुणे : लाडकी बहीण नावाने सध्या मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू असून नागरिकांची गोंधळलेली अवस्था झाली आहे. भावाने केलेल्या मदतीची कधीही जाहिरात केली जात नाही. गोरगरिबांचे शोषण करून विविध माध्यमातून जमा केलेला कर हा आपलाच पैसा आहे. लाडकी बहिणी योजनेतून तो परत येत आहे. राज्यात महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा अनेक समस्या आहेत. तीन वर्षाची मुलगी असो की 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही. बलात्कारांच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. भाजपशी संबंधित कुठल्याही घटनेत गुन्हा दाखल होत नाही. रात्री - अपरात्री घडणाऱ्या गुन्हेगारी घटना दिवसाढवळ्या समाज माध्यमांसमोर आणि पोलीस स्टेशन मध्ये घडत आहेत. कोयता गँग चा हैदोस, पोलिस सुरक्षित नाहीत. असे नाव घेत विविध मुद्द्यावरती महायुती सरकारवर यांच्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी प्रचार सांगताच्या शेवटच्या टप्प्यात जहरी टीका केली.
महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार मोहन जोशीं,अंकुश काकडे, माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल,अशोक हरणावळ,स्वाती पोकळे,भगवानराव साळुंखे,शहर अध्यक्ष मृनाली वाणी, राहुल तुपेरे,शैलेद्र नलावडे, शशिंकात तापकीर,सुरज लोखंडे,अमोल रासकर,सचिन देडे,सचिन जोगदंड,तुषार नांदे,ऋषिकेश भुजबळ,निलेश पवार,लखन वाघमारे,अमोल ननावरे,संजय दामोदरे,अमोल परदेशीझ निलेश खंडाळे,सतीश पवार,पुष्कर अबनावे,बाळासाहेब अटल,भरत सुराणा,सचिन पासळकर,अनिल सातपुते,रवी ननावरे आदी महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यापुढे बोलताना अंधारे म्हणाल्या,"भाजपाचे नेते महिला संदर्भात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ भाषा वापरतात. आया - बहिणींची अब्रू सुरक्षित ठेवण्यासाठी, बेरोजगार हातांना काम देण्यासाठी, महागाईचा दर कमी करण्यासाठी, गुंडशाही दडपशाही चा बंदोबस्त करण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी "तुतारी वाजवणारा माणूस" या चिन्हसमोरील बटन दाबून अश्विनी नितीन कदम यांना विजयी करण्याचे आवाहन शिवसेना नेते सुषमा अंधारे यांनी केले.
यावेळीमहाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी मागील पंधरा वर्षातील आपल्या कामाचा आढावा मतदारांना सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल खडके यांनी केले. आभार शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांनी मांडले. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.