Vidhan sabha 2019 : एमआयएमलाच युतीचं कुलुप उघडता येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 01:20 PM2019-09-23T13:20:27+5:302019-09-23T13:25:29+5:30
एमआयएम साेबतची युती आम्ही ताेडली नसून युतीच्या कुलपाची चावी एमआयएमकडेच असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
पुणे : एमआयएमसाेबतच्या युतीला आम्ही कुलुप लावले नाही. त्यांनी कुलुप लावले आहे. त्याची चावी सुद्धा त्यांच्याकडे आहे, त्यामुळे एमआयएम वंचितच्या युतीचं कुलुप एमआयएमलाच उघडता येईल असे स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.
पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. आंबेडकर म्हणाले, एमआयएमसाेबतची युती आम्ही ताेडली नाही तर एमआयएमनेच कुलुप लावले आहे. त्यामुळे युतीचे कुलुप एमआयएमच उघडू शकते. वंचितच्या समितीशी एमआयएमने बाेलणी चालू ठेवावी. अनेक मुस्लिम संघटनांनी त्या वंचितसाेबत असल्याचे आम्हाला सांगितले आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच येणाऱ्या निवडणुका या आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यात काही पक्ष हे धर्माच्या नावावर तर काही पक्ष हे धर्मनिरपेक्षतेच्या नावावर निवडणुक लढवत असून निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या गेल्या पाहिजेत असेही मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.
राज ठाकरेंबाबत बाेलताना ते म्हणाले, राज ठाकरेंनी लाेकसभेला अनेक विकासाचे मुद्दे मांडले परंतु त्यांच्या पक्षाने निवडणुक लढवली नाही.