२० हजार महिलांमागे फक्त एकच स्वच्छतागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 03:33 AM2019-03-11T03:33:30+5:302019-03-11T03:33:42+5:30

राष्ट्रीय निकष : ४० ते ५० व्यक्तींमागे एक शौचालय असावे

Only one bathroom for 20 thousand women | २० हजार महिलांमागे फक्त एकच स्वच्छतागृह

२० हजार महिलांमागे फक्त एकच स्वच्छतागृह

Next

- माऊली शिंदे

कल्याणीनगर : नगर रोड-वडगावशेरी क्षेत्रीय अतंर्गत वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, म.हौ. बोर्ड, कल्याणीनगर, लोहगाव या भागातील जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त महिलांची लोखसंख्या आहे. या महिलांसाठी फक्त सातच स्वच्छतागृहे क्षेत्रीय कार्यालयाने बांधली आहेत. जवळपास वीस हजार महिलांमागे एक स्वच्छतागृह आहे. स्वच्छतागृह नसल्याने महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे.

महिलांसांठी स्वच्छतागृहांच्या बाबतीत धोरण आखावे अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. गर्दीच्या ठिकाणी शंभर महिलांमागे एक स्वच्छतागृह असावे. तसेच ४० ते ५० व्यक्तींमागे एक शौचालय असावे असा राष्ट्रीय निकष आहे. मात्र, पालिकेने उच्च न्यायालयाची सूचना आणि स्वच्छतागृहा बाबत असलेले राष्ट्रीय निकष या दोन्ही गोष्टी कडे दुलर्क्ष केले आहे. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाअतंर्गत वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, गांधीनगर, कल्याणीनगर, संजय पार्क आणि लोहगाव हा परिसर येतो. या परिसाची लोखसंख्या जवळपास साडेतीन लाखांपेक्षा जास्त आहे. या भागातील महिलांची लोकसंख्या दीड लाखापेक्षा जास्त आहे. तसेच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आयटी पार्क, कॉल सेंटर, शॉपिंग मॉल, हॉटेल्स आणि खासगी कार्यालय आहे. या ठिकाणी कामासाठी अनेक महिला येतात. या कामाला येणाऱ्या महिला सार्वजनिक आणि खासगी वाहनाचा वापर करतात. या महिलांसाठी या भागात स्वच्छतागृह नाही. जी स्वच्छतागृह आहेत ती वर्दळीपासून दूर आहेत. स्वच्छतागृहामध्ये पाणी नसणे, अस्वच्छता आदी समस्या आहेत.

सहा. आयुक्तांना महिलांच्या समस्यांचे गांभीर्य नाही
नगर रोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाने आतापर्यंत महिला स्वच्छतागृहासाठी किती निधी खर्च केला. महिला स्वच्छतागृह का बांधले जात नाही आदी प्रश्नाच्या उत्तरांसाठी नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यलयाचे सहा. आयुक्त राजेश बनकर यांना फोन केला होती. मात्र, त्यांनी फोन घेऊन लगेच बंद केला. क्षेत्रीय कार्यालयांर्तगत कोणतीही माहिती सहा. आयुक्तांना विचारल्यावर, मी नवीन आहे असेच ते सांगतात. सहा. आयुक्त नागरिकांचे फोन घेत नाहीत. फक्त राजकीय प्रतिनिधींचा फोन घेतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्वच्छतागृह नसल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाम
महिला स्वच्छतागृह नसल्याने लघवीला जास्त जावे लागू नये म्हणून अनेक महिला कमी पाणी पितात. लघवी रोखून धरतात. सतत लघवी रोखून धरल्याने स्नायूंवर आणि किडनीवर ताण पडतो. बृद्धकोष्ठ, मुतखडा, रक्ताभिसरण आणि डोकेदुखीचा त्रास होतो. अस्वच्छ स्वच्छतागृहाचा वापर केल्यामुळे जंतुसंसर्ग होतो.

Web Title: Only one bathroom for 20 thousand women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.