Pune Corona News: शहरात दिवाळीच्या तीन दिवसात कोरोनामुळे केवळ एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 07:05 PM2021-11-07T19:05:34+5:302021-11-07T19:07:18+5:30

दिवाळी सणानिमित्त सुट्टी असली तरी, गेल्या तीन दिवसात शहरात ११ हजार ६०९ जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली आहे

Only one death due to corona in three days of diwali in the city | Pune Corona News: शहरात दिवाळीच्या तीन दिवसात कोरोनामुळे केवळ एकाचा मृत्यू

Pune Corona News: शहरात दिवाळीच्या तीन दिवसात कोरोनामुळे केवळ एकाचा मृत्यू

googlenewsNext

पुणे: दिवाळी सणानिमित्त सुट्टी असली तरी, गेल्या तीन दिवसात शहरात ११ हजार ६०९ जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली आहे. या सर्वांमध्ये १४५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर या तीन दिवसांमध्ये शहरातील केवळ एक जण शनिवारी कोरोनामुळे दगावला असून, उपचारासाठी पुण्याबाहेरून शहरात दाखल असलेल्यांपैकी ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.  

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या आजमितीला ६५७ इतकी आहे. तर गेल्या तीन दिवसात २३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७३ कोरोनाबाधितांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, १०३ जण गंभीर आहेत. आजपर्यंत शहरात ३५ लाख ८२ हजार ५० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ५ लाख ४७ हजार ५९ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, यापैकी ४ लाख ९५ हजार २५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आतापर्यंत ९ हजार ७७ जणांचा मृत्यू झाला आहे.  

रविवारीची आकडेवारी

एकूण तपासण्या - ५६६७
कोरोनाबाधित - ६९
कोरोनामुक्त - ८२
मृत्यू - ० 

Web Title: Only one death due to corona in three days of diwali in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.