शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याने एकच शाळा बंद, बाकी सुरू -जिल्ह्यात पूर्ण दक्षता घेऊन सुरू आहेत शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:47+5:302021-08-01T04:09:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असून, रुग्णसंख्यादेखील वेगाने कमी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असून, रुग्णसंख्यादेखील वेगाने कमी होत आहे. यामुळेच शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी १०३ शाळा सुरू झाल्या. जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करताना पूर्ण दक्षता घेतली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियमित काळजी घेतली जात आहे. यामुळेच गेल्या पंधरा दिवसांत सुरू झालेल्या शाळांपैकी केवळ भोर तालुक्यातील एका शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ती बंद करण्यात आली. अन्य सर्व शाळा सुरू आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी पुणे जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित प्रमाणात हा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. यामुळेच जिल्ह्यात बारामती तालुक्यातील, हवेली तालुक्यातील काही शाळा आणि पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा मात्र सुरू झालेल्या नाहीत. ज्या तालुक्यातील शाळा सुरू झाल्यात तेथे अधिक खबरदारी घेऊन शाळा सुरू आहेत.
-----
जिल्ह्यात एकूण शाळा - ९८२
सध्या सुरू असलेल्या शाळा - १०२
तालुका सुरू शाळा पुन्हा बंद केलेल्या शाळा
आंबेगाव ८ -
बारामती - -
भोर ०४ ०१
दौंड ०३ -
हवेली ०२ -
इंदापूर २७ -
जुन्नर १४ -
खेड ०८ -
मावळ ०४ -
मुळशी ०८ -
पुरंदर ११ -
शिरूर ०४ -
वेल्हा ०९ -
एकूण १०१ १
-‐-------------
विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थितीत तालुकानिहाय संख्या तालुका उपस्थितीत विद्यार्थी
आंबेगाव ८१२
बारामती -
भोर २३६
दौंड ८८
हवेली ३८
इंदापूर १५०९
जुन्नर ४४५
खेड ६६०
मावळ १९९
मुळशी १७७
पुरंदर ९५४
शिरूर २२२
वेल्हा ८९
एकूण ५३६९
-------
पंधरा दिवसांत एकच शाळा बंद
जिल्ह्यात शासनाच्या आदेशानुसार आठवी ते दहावी पर्यंतच्या पहिल्याच दिवशी १०३ शाळा सुरू झाल्या होत्या. ज्या भागात रुग्णसंख्या व पाॅझिटिव्ह दर जास्त आहे, अशा ठिकाणी अद्याप ही शाळा सुरू झालेल्या नाहीत. केवळ भोर तालुक्यातील एक शाळा आठ दिवसांनंतर बंद करण्यात आली.
------------