Pune Corona Vaccination: पुणे शहरात सोमवारी १५ केंद्रांवर मिळणार फक्त कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 08:30 PM2021-05-30T20:30:12+5:302021-05-30T20:30:19+5:30
कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस ३ मेपूर्वी घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य
पुणे: शहरातील ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ३ मे पूर्वी घेतला आहे. अशा नागरिकांना उद्या ( सोमवारी ) १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़
शहरातील प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयनिहाय महापालिकेच्या एका केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी १०० डोस वितरित करण्यात आले आहेत़. दरम्यान राज्य शासनाकडून महापालिकेला कोव्हिशिल्ड लसीचे डोस उपलब्ध न झाल्याने, आज शहरात महापालिकेच्या कोणत्याही केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार नसल्याचे महापालिकेने कळवले आहे़.
देशात सर्वच ठिकाणी कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लस देण्यात येत आहेत. परंतु महाराष्ट्रासहित इतर राज्यातही लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम राज्यातील सर्वच जिल्ह्यांवर होत आहे. एक जून नंतर सर्व काही सुरळीत होण्याचे आश्वासन प्रशासन देत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून उपलब्ध होईल. त्यानुसार महापालिकांना लसीचे डोस वितरित केले जात आहेत.