कोरोनाला न घाबरता धीराने तोंड देणे हाच उपाय : कोलते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:38+5:302021-03-23T04:12:38+5:30
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या “कोरोनाच्या दारातून परत’ या स्वानुभवाच्या पुस्तकाचे प्रकाशन करणेत ...
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या “कोरोनाच्या दारातून परत’ या स्वानुभवाच्या पुस्तकाचे प्रकाशन करणेत आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कोलते बोलत होते. माजी आमदार अशोक टेकवडे अध्यक्षस्थानी होते .जीवनात सकारात्मकता ठेवली ,आनंदी राहिले काळजी घेतली तर आपण गंभीर आजारातून बरे होऊ शकतो ,माझे अनुभव इतरांना कळावेत म्हणून पुस्तक लोहिले माझे सर्व सहकारी,नातेवाईक,गावकरी यांच्या आशीर्वादाने मी ब्रा झालो असे मनोगत पुस्तकाचे लेखक विजय कोलते यांनी व्यक्त केले . भानुदास कोलते ,पुण्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील ,सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालिका सौ रश्मी कोलते,डॉ अजित साबळे ,डॉ .राजेश दळवी ,साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ऍड अण्णासाहेब खाडे ,यांनी मनोगत व्यक्त केले . कोरोनाचे सुरवातीचे काळात गोंधळाचे वातावरण होते पण आता परिस्थिती सुधारली आहे विजय कोलते यांची सकारात्मकरहाण्याची भूमिका आहे .समाजासाठी काम करणारे व्यक्तिमत्वांचे त्याच्या अनुभवाचे पुस्तक वाचून आत्मविश्वास वाढणार आहे असे विचार अशोक टेकवडे यांनी व्यक्त केले शांताराम पोमण यांनी प्रास्ताविक केले . शिवाजी घोगरे यांनी आभार मानले सचिन घोलप यांनी सूत्रसंचालन केले . कार्यक्रमास सौ शशिकला कोलते ,गौरव कोलते ,बंडूकाका जगताप ,डॉ जगदीश शेवते ,कुंडलिक मेमाणे इ मान्यवर उपस्थित होते
--