‘सोमेश्वर’ नोंद असणाऱ्याच उसाचे गाळप करणार : जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:23+5:302021-06-19T04:08:23+5:30

--- सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ऊस गळीत हंगामात सभासदांचा १५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध ...

Only Someshwar will grind sugarcane with registration: Jagtap | ‘सोमेश्वर’ नोंद असणाऱ्याच उसाचे गाळप करणार : जगताप

‘सोमेश्वर’ नोंद असणाऱ्याच उसाचे गाळप करणार : जगताप

Next

---

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ऊस गळीत हंगामात सभासदांचा १५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. तसेच सभासदांव्यतिरिक्त बिगर नोंदीचा तसेच नियमबाह्य ७ ते ८ हजार एकर ऊस उपलब्ध आहे. मात्र आपल्या कारखान्याकडे नोंद असणाराच ऊस गाळप करण्यासाठी संचालक मंडळ बांधील असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.

जगताप पुढे म्हणाले, सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी तब्बल ३७ हजार ९०८ हजार एकरांवरील तब्बल १५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. बिगरनोंदीचा व नियमबाह्य असा ३ लाख टन उपलब्ध आहे. मात्र नोंदीचा ऊस वगळता इतर ऊस गाळपासाठी आपण बांधील नाही. ऊसतोडणी मजुरांची घटती संख्या लक्षात घेता इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक ऊस शेतीकडे वळणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळाले असून प्रथमच सहा फुटी सरी व दीड फुटावर एक डोळा अशा पद्धतीने ऊस लागवडी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या वर्षी जवळपास दीडशे एकर क्षेत्रावर सहफुटी सरीचा प्रयोग राबविला जात आहे. सर्वच शेतक-यांनी अशा पद्धतीच्या आधुनिक शेतीकडे वळावे जेणे करून हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊसतोड करता येईल.

गेल्या हंगामात सोमेश्वरने आपल्या कार्यक्षेत्रातील जवळपास सव्वादोन लाख टन ऊस गाळपासाठी इतर कारखान्यांना दिला होता. येणारा गळीत हंगाम आव्हानात्मक असला तरी सध्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून कोरोनाचे संकट व इतर काही तांत्रिक अडचणी असल्या तरी जानेवारीमध्ये कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे जगताप यांनी सांगितले.

————————————————

Web Title: Only Someshwar will grind sugarcane with registration: Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.