आंबिल ओढ्यतील नागरिकांचे फक्त तात्पुरते स्थलांतर: नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 12:51 PM2021-06-30T12:51:06+5:302021-06-30T12:52:53+5:30
दिलेली जागा पसंत नसेल तर पर्याय देणार गोऱ्हे यांचा दावा
आंबिल ओढयातल्या नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर होणार आल्याचे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हणले आहे. गोऱ्हे यांनी आज महापालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत आंबिल ओढ्यची पाहणी केली. त्यानंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
आंबिल ओढ्या मध्ये झालेल्या अतिक्रमण कारवाईला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. आक्रमक झालेल्या नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन देखील केलं होतं. एकीकडे या प्रकरणावरून राजकारण रंगलेले असतानाच अनेक नेत्यांनी या घटनास्थळाला भेट देत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले होते. या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासून सक्रिय असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी आज अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण आंबिल ओढयाची पाहणी केली.यावेळी इथे होणाऱ्या कामाबाबत सादरीकरण देखील करण्यात आलं.
यानंतर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या," आंबिल ओढ्याच्या काठी राहणाऱ्या नागरिकांचे कायमचे स्थलांतर होणार नाही.फार तर तात्पुरते स्थलांतर होईल. आत्ता जिथे कारवाई झाली ,घरे पाडण्यात आली , ती जागा पसंत नसेल तर दुसरीकडे स्थलांतर करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतली होती. मात्र मार्ग काढण्याआधीच कारवाई झाली."