सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 06:45 PM2023-03-26T18:45:01+5:302023-03-26T18:45:08+5:30

भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही पण जे दोन चार टक्के लोक हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात

Only the taunting of the current opposition continues Chandrasekhar Bawankule targets Uddhav Thackeray | सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

googlenewsNext

बारामती : भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही. मात्र जे दोन चार टक्के आहेत. ते हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात. आमची लढाई त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. विरोधकांचे काम असते लोकांचे प्रश्न सरकार पुढे मांडून ते सोडवणे. मात्र सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

 बारामती येथे रविवारी ( दि. २६) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच यावेळी इंदापूर व बारामती मध्ये भाजप युवा मोर्चाच्या 52 शाखांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे व इतर विरोधकांवर टीका केली. 

बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्यानंतर आमच्याही सभा होतील. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. जनतेच्या कोर्टामध्ये आता याचा फैसला होईल. महाराष्ट्रातील जनतेला आता टीकाटिप्पणी नको आहे. त्यांना विकास हवा आहे, असे बावनकुळे म्हणाले. 

सांगवी ( ता. बारामती ) येथील शेतकऱ्यांनी नीरा नदी मधील प्रदूषणाबाबत अनेक वेळा प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. त्याचप्रमाणे येथील शेतकऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना देखील निवेदन दिले होते. येथील वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना या परिसरात राहणे मुश्किल झाले आहे. परिणामी आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी या परिसराला भेट देत येथील पाहणी केली. यावर बोलताना ते म्हणाले, यापूर्वीच्या तक्रारींबाबत कोणी काय कारवाई केली हे पाहत बसण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून येथील समस्येवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

दरम्यान, नीरा नदीमध्ये या परिसरातून अनेक कारखान्याचे प्रदूषित पाणी तसेच बेकायदेशीर कत्तलखान्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर मिसळले जात आहे. त्यामुळे एक प्रकारचा उग्र वास या ठिकाणी येत असतो, यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, हे सर्व भयंकर आहे. निश्चित सरकारने यावर उपाययोजना करायला हवी. प्रश्न मी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. मला जे प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न मी हा प्रश्न सोडवण्यासाठी करणार आहे. नीरा नदीचे हे प्रदूषित पाणी पंढरपूर पर्यंत जाते. त्यामध्ये भाविक आंघोळ करतात अत्यंत भयंकर आहे, याबाबत मी सरकारशी बोलणार आहे असेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: Only the taunting of the current opposition continues Chandrasekhar Bawankule targets Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.