नि व ड णु की सा ठी का ही ही

By Admin | Published: July 25, 2015 05:05 AM2015-07-25T05:05:49+5:302015-07-25T05:05:49+5:30

हवेली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस यांतील रंगत वाढू लागली आहे. अनेक गावच्या

The only thing about Nidu's is that | नि व ड णु की सा ठी का ही ही

नि व ड णु की सा ठी का ही ही

googlenewsNext

लोणी काळभोर : हवेली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस यांतील रंगत वाढू लागली आहे. अनेक गावच्या अतिउत्साही सधन पॅनलप्रमुखांनी आपल्या गावातील पॅनलची जुळवाजुळव पूर्ण करण्याकामी आरक्षण प्रवर्गातील उमेदवार मिळत नसल्यामुळे उमेदवारांची सरकारी थकबाकी व ग्रामपंचायत घरपट्टी व इतर कर भरल्याने आता आपण निवडून येवो अथवा न येवो; परंतु आपली शासकीय थकबाकी शून्य झाल्यामुळे ते खूश आहेत.
मिळालेल्या लायक उमेदवारास आपल्या पॅनलमधून उमेदवारी देण्यासाठी केवळ शौचालय नसल्याचा अडसर होऊ नये, म्हणून चक्क पॅनलप्रमुखांनी स्वखर्चातून त्वरित शौचालय बांधून दिले व त्याची ग्रामपंचायत दफ्तरी नोंद केल्यामुळे पॅनलप्रमुखास चांगला उमेदवार मिळाला, तर त्या व्यक्तीस शौचालय तेही मोफत बांधून मिळाल्याने दोघांच्याही अडचणी दूर झाल्या. विशेष म्हणजे त्याच्या विरोधकांनी माघार घेतल्यामुळे हा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
बऱ्याच वेळेस खुल्या प्रवर्गातील उमेदवारास आपल्या प्रतिष्ठेपायी व मतांच्या बेरजेच्या आशेपोटी प्रभागातील इतर आरक्षित उमेदवारांचा खर्चही मोठ्या प्रमाणावर उचलावा लागतो.

पूर्व हवेलीतील पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका ग्रामपंचायतीच्या प्रभागात आरक्षण प्रवर्ग विभागातील एक उमेदवार मिळत नसल्यामुळे पॅनलप्रमुख हैराण झाले होते. त्यांना निवडून येण्याची खात्री असलेला एक उमेदवार मिळाला; परंतु त्याच्याकडे शौचालय नसल्यामुळे शासकीय अटीनुसार तो उमेदवारीच्या कक्षेत बसत नव्हता. तो त्या भागात लोकप्रिय व सर्वांशीच मिळून मिसळून असल्यामुळे तसेच त्याच्याकडे जातीच्या दाखल्यासह निवडणूक लढवण्यास लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्यामुळे त्याला निवडणुकीस उभे राहण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्या व्यक्तीने आपली परिस्थिती सधन नसल्याने व आपल्याकडे शौचालय नसल्यामुळे निवडणूक रिंगणात उतरण्यास प्रामाणिकपणे नकार दिला. परंतु आपली राजकीय प्रतिष्ठा राजकीय गुणांची चुणूक दाखवत, अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी पॅनलप्रमुखांसमवेत त्यांच्या क्रियाशील कार्यकर्त्यांनी फक्त आश्वासन न देता तसेच वेळ न दवडता तत्काळ सरकारी थकबाकी पूर्णपणे भरून दोनच दिवसांत शौचालय उभारून त्या सर्वमान्य उमेदवाराची व पॅनलचीही अडचण दूर केली. (वार्ताहर)

Web Title: The only thing about Nidu's is that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.