मार्ग एकच, तिकीट मात्र वेगळे

By Admin | Published: December 10, 2014 12:03 AM2014-12-10T00:03:28+5:302014-12-10T00:03:28+5:30

आर्थिकदृष्टय़ा खिळखिळ्या झालेल्या पुणो महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) अधिकारीच आणखी तोटय़ात घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

The only way, tickets are different | मार्ग एकच, तिकीट मात्र वेगळे

मार्ग एकच, तिकीट मात्र वेगळे

googlenewsNext
पुणो : आर्थिकदृष्टय़ा खिळखिळ्या झालेल्या पुणो महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) अधिकारीच आणखी तोटय़ात घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणो स्टेशन ते आझादनगर या एकाच मार्गावर धावणा:या दोन बसेस, अंतरही सारखेच, मात्र तिकीट दरामध्ये पाच रुपयांचा फरक आढळून आला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षापासून पीएमपीला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
कोटय़वधी रुपयांची देणी असलेल्या पीएमपीला त्यामुळे दररोज शेकडो बस बंद ठेवाव्या लागत आहेत. तोटय़ात असलेल्या ‘पीएमपी’ला आर्थिक बळ देण्याची ओरड सातत्याने केली जात आहे, तर दुसरीकडे मात्र पीएमपीतील अधिकारीच तोटय़ात भर घालत असल्याचे दिसून येते. पीएमपी बस मार्ग क्र. 177 व मार्ग क्र. 177 अ या दोन्ही बस पुणो स्टेशनमार्गे आझादनगर या मार्गावरून धावतात. मार्ग क्र. 177 अ ही बस साधारणत: दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आली आहे. या बसमधील वाहकाकडून पुणो स्टेशन ते आझादनगर या अंतरासाठी प्रवाशांना ई मशिनद्वारे 1क् रुपयांचे तिकीट दिले जाते, तर मार्ग क्र. 177 या बसच्या मशिनमधून याच 
अंतरासाठी 15 रुपयांचे तिकीट दिले जाते. या मार्गावर दोन्ही बसेसच्या दोन फे:या आहेत. 
तिकीट दरातील घोळामुळे 177 अ क्रमांकाच्या बसला दररोज अंदाजे 2 हजार रुपये नुकसान होत आहे. हे नुकसान गेल्या दोन वर्षापासून होत असल्याने कंपनीला जवळपास 7  ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
 
ई-मशिनमधील त्रुटी
बस क्र. 177साठी पुणो स्टेशन ते आझादनगर्पयत 7 टप्पे पडतात. तर 177 अ या बससाठी साळुंखे विहार्पयत 6 टप्पे आहेत. ई-मशिनमध्ये साळुंखे विहार हा टप्पा निर्धारित नसल्याने तिकीट देताना सहा टप्पेच ग्राह्य धरले जातात. त्यामुळे दोन बसेससाठी आझादनगर्पयतच्या तिकिटामध्ये एका टप्प्याचा फरक म्हणजे 5 रुपयांचा फरक असल्याचे पुणो स्टेशन बस डेपोतील अधिका:यांनी सांगितले.
 
संघटनेमार्फत तिकीट दरातील घोळाबाबत पुणो स्टेशन डेपोप्रमुख व तिकीट विभागप्रमुखांना यापूर्वी अनेक वेळा सांगण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कमी तिकीट असलेल्या बसमधून जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे पीएमपीला होणारा तोटा या अधिका:यांच्या निष्काळजीपणामुळे होत 
आहे. 
- अशोक जगताप 
उपाध्यक्ष, पीएमपी इंटक

 

Web Title: The only way, tickets are different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.