माणूस माणुसकीने वागायला लागेल, तेव्हाच कोरोना जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:02+5:302021-05-18T04:12:02+5:30
पुणे : कोरोनाने माणसाला कसे जगायचे हे शिकवले. जोपर्यंत जगातील शेवटचा माणूस शहाणा होत नाही, तोपर्यंत कोरोना जाणार नाही. ...
पुणे : कोरोनाने माणसाला कसे जगायचे हे शिकवले. जोपर्यंत जगातील शेवटचा माणूस शहाणा होत नाही, तोपर्यंत कोरोना जाणार नाही. माणूस माणुसकीने वागायला लागेल, तेव्हा कोरोना खऱ्या अर्थाने नष्ट होईल. त्यामुळे कोरोनाला नावे ठेवण्यापेक्षा या परिस्थितीशी लोककलाकारांसह सर्वांनीच लढायला हवे, असे मत महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सवातील उत्साही कार्यकर्त्यांचे व्यासपीठ असलेल्या विधायक पुणेतर्फे विश्रामबागवाड्याजवळील झांजले विठ्ठल मंदिरात प्रातिनिधीक स्वरुपात २० लोककलाकार, वारकरी आदींना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. यावेळी इस्कॉन पुणे, अन्नामृत फाऊंडेशनचे संजय भोसले, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, आनंद सराफ, विठ्ठल मंदिराचे अखिल झांजले, हेमंत जाधव, डॉ.धर्मराज साठे आदी उपस्थित होते.
सुरेश लक्ष्मण जोशी यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने हा शिधा देण्यात आला. राकेश कोकाटे, डॉ. स्वप्निल शेठ, उमेश सोनेरी, कपिल कासवा, सारंग सराफ आदींनी संयोजनात सहभाग घेतला.