ओतूर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थपितांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:46+5:302021-01-20T04:11:46+5:30
ओतूर:ओतूर(ता. जुन्नर) ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथापितांना मोठा धक्का बसला असून काही दिग्गजदेखील पराभूत झाले आहेत. ओतूर ग्रामपंचायतमध्ये १७ सदस्य जागेसाठी ...
ओतूर:ओतूर(ता. जुन्नर) ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथापितांना मोठा धक्का बसला असून काही दिग्गजदेखील पराभूत झाले आहेत. ओतूर ग्रामपंचायतमध्ये १७ सदस्य जागेसाठी एकूण ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये अनेक दिग्गज निवडणूक लढवत असताना त्यांना मतदारांनी धक्का दिला असून यावेळी नवीन चेहरे ग्रामपंचायतचा कारभार करणार आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत चैतन्य परिवर्तन पॅनेलचे १४ उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळून वर्चस्व प्राप्त झाले आहे. गेल्या २० वर्षांपासून ओतूर ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेची सत्ता अबाधित होती. मात्र २०२१ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे या निवडणूक निकालात स्पष्ट झाले आहे. या निवडणूकीत ओतूर विकास आघाडीने १७ उमेदवार उभे केले होते आघाडीची तर बिघाडीच झाली व शिवसेनेला देखील बिघाडी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
वॉर्डनिहाय विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
वॉर्ड क्र.१
:
प्रशांत सखाराम डुंबरे - ९३० मते
वनिता बटवाल - ८१० मते
रंजना तुकाराम डुंबरे - ८२४ मते
वॉर्ड क्र.२ :
आशिष भाऊसाहेब गोंदके - ७८० मते
वाकर राजेश पांडुरंग - ६८० मते
शोभा अरुण ढमाले - ७५४ मते
वॉर्ड क्र.३
:
प्रेमानंद जयसिंग अस्वार - ८५६ मते
वारे मनीषा संजय -१०२९ मते
वॉर्ड क्र.४:
आशिष शामकुमार शहा - ५८७ मते
वैशाली सचिन ताजवे -५६२ मते
छाया अतुल तांबे - ५६३ मते
वॉर्ड क्र.५
:
संचित फापाळे - १०५५ मते
गोरक्षनाथ फापाळे - ८९५ मते
पानसरे गीता विनीत - ८४६ मते
वॉर्ड क्र.६
:
दिलीप मारुती डुंबरे -८३२ मते
खंडागळे मयूरी - ७६५ मते
डुंबरे शकुंतला - ७१६ मते
ओतूरच्या माजी सरपंच बाळासाहेब घुले, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माजी सरपंच धनंजय डुंबरे, राष्ट्रवादीचे युवा नेते वैभव तांबे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्षमण शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल तांबे यांच्या पत्नी सीमा तांबे व माजी सरपंच दत्तात्रय रोंगटे अशा दिग्गजांना या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला.
या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण ६ वाॅर्डातील ३९९ मतदारांनी नोटाचा वापर केला. राष्ट्रवादी पुरस्कृत चैतन्य पेनलचे सर्व उमेदवार एकीने कपर्दिकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
राष्ट्रवादी पेनलचे विजयी उमेदवार