पुण्यातील दीड महिन्यांपासून अनेक रुग्णालयांमधील बंद असलेल्या ओपीडी, शस्त्रक्रिया सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:53 PM2020-05-11T12:53:22+5:302020-05-11T13:09:29+5:30

लॉकडाऊनमुळे सर्वच रुग्णालयांना नियोजित शस्त्रक्रिया तसेच ओपीडी सुविधा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

OPD, surgery to be started in hospitals at Pune city | पुण्यातील दीड महिन्यांपासून अनेक रुग्णालयांमधील बंद असलेल्या ओपीडी, शस्त्रक्रिया सुरु होणार

पुण्यातील दीड महिन्यांपासून अनेक रुग्णालयांमधील बंद असलेल्या ओपीडी, शस्त्रक्रिया सुरु होणार

googlenewsNext
ठळक मुद्देकिती दिवस थांबणार? : रुग्णांकडूनच होतेय विचारणामुलांचे लसीकरण, गर्भवती महिलांची तपासणी, मधुमेहासह अन्य आजारांचा पाठपुरावा आवश्यक

पुणे : कोरोना विषाणुच्या संसर्गांमुळे दीड महिन्यांपासून अनेक रुग्णालयांमधील बंद असलेली बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि शस्त्रक्रिया सुरू करण्याची तयारी खासगी रुग्णालयांनी केली आहे. अनेक शस्त्रक्रिया फार काळ लांबविता येणार नाहीत. तसेच मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब यांसह विविध जोखमीच्या आजारांसाठी आवश्यक असलेला पाठपुरावाही करणे आवश्यक असल्याने ओपीडी सुविधा बंद ठेवून चालणार नाही. त्यामुळे या सुविधा सुरू करण्याचा निर्णय काही रुग्णालयांनी घेतला आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वच रुग्णालयांना नियोजित शस्त्रक्रिया तसेच ओपीडी सुविधा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार या सेवा बंद करण्यात आल्या. केवळ प्रसुती, अपघात किंवा इतर तातडीच्या शस्त्रक्रिया आणि उपचार सुरू आहेत. सुमारे ९० ते ९५ टक्के शस्त्रक्रिया बंद होत्या. पण आता अनेक रुग्णांकडूनच विचारणा होऊ लागली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मेंदूविषयक शश्त्रक्रिया, यकृत, मूत्रविकार आणि कर्करोग निगडित शश्त्रक्रियांचा समावेश आहे. गंभीर व दीर्घकालीन रोगांनी ग्रस्त असलेले  रुग्ण संपर्क करत आहेत. ऑथोर्पेडिक,  लॅप्रोस्कोपिक उपचारासाठी येणाºया रुग्णांकडून  विचारणा सध्या कमी आहे. काही शस्त्रक्रिया फार काळ पुढे ढकलता येत नाहीत. त्यांनाही काही मयार्दा आहेत. अन्यथा जीवावर बेतु शकते, असे रुग्णालयांचे म्हणणे आहे. त्यामुळे या आजारांच्या शस्त्रक्रिया व ओपीडी सुविधा सुरू केल्या जाणार आहेत.
------------
रुग्णालयात आवश्यकतेनुसार या शस्त्रक्रिया दररोज सुरू आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ अनेस्थेशिया आणि इंडियन असोसिएशन ऑफ सर्जन्स च्या  मार्गदर्शक सूचनांनुसार प्रोटोकॉल्स तयार केले आहेत. स्वच्छता, निजंतुर्कीकरण, तातडीच्या शस्रक्रियेदरम्यान संपूर्ण पीपीई कीटचा वापर, सामान्य किंवा पूर्व नियोजित शश्त्रक्रिया होणार असणाऱ्या रुग्णांची कोविड चाचणी अशा उपाय योजना केल्या जात आहेत.
- डॉ सुनील राव, समूह वैद्यकीय संचालक, सह्याद्री हॉस्पिटल्स
----------
काही शस्त्रक्रिया फार कार थांबविता येत नाहीत. म्हणून सोमवार (दि. ११) पासून रुग्णालयाचे नियमित कामकाज सुरू करत आहोत. त्याआधी संपुर्ण रुग्णालय, ऑपरेशन थिएटर सॅनिटाईज करण्यात आले आहेत. सर्व ओपीसी सुविधा सुरू होतील. तसेच धोका जास्त असलेल्या शस्त्रक्रियाही सुरू होतील. तीन स्तरावर तपासणी करूनच या शस्त्रक्रिया होतील. त्यासाठी पीपीई कीटसह आवश्यक उपाययोजना केल्या जातील.
- डॉ. संजय पठारे, वैद्यकीय संचालक, रुबी हॉल क्लिनिक
-----------
रुग्णालयात ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियांची गरज लक्षात घेऊन त्याही केल्या जातील. कोरोनाची तीव्रता कमी होईपर्यंत जीवाला धोका नाही, अशा नियोजित शस्त्रक्रिया होणार नाहीत. लहान मुलांचे लसीकरण, गर्भवती महिलांची तपासणी, मधुमेहासह अन्य काही जुनाट आजारांचा पाठपुरावा होणे आवश्यक आहे. त्यानुसार आता ओपीडी सुरू केली जाईल.
- डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पीटल
-----------
हमीपत्र घेणार...
सध्या शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला आहे. अनेकांना लक्षणेही दिसत नाहीत. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या कोणालाही लागण झालेली असु शकते. त्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कोरोनाची लागण होऊ शकते किंवा त्याला रुग्णालय जबाबदार राहणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले जाऊ शकते. कारण नातेवाईकांकडून रुग्णालयांवरच आरोप केले जाऊ शकतात, असे एका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
--------------
रुग्ण, नातेवाईकांसाठी प्रोटोकॉल...
- रुग्ण, नातेवाईकांना मास्क घालणे बंधनकारक
- रुग्णासोबत केवळ एकाच नातेवाईकाला रुग्णालयात प्रवेश
- रुग्णाजवळ फारवेळ थांबता येणार नाही
- सातत्याने हात धुवणे, स्वच्छता ठेवणे आवश्यक
- रुग्णाचा आजार पाहूनच सेवा
-------------------

Web Title: OPD, surgery to be started in hospitals at Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.