नागरिक व महिलांसाठी ओपन जीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:50 AM2018-10-05T02:50:18+5:302018-10-05T02:50:33+5:30
यावेळी चव्हाण म्हणाल्या, ‘आंबेगाव पठार हा पुणे महानगरपालिकेतील आविकसित भाग आहे. या भागात बऱ्याच समस्या असून, हा भाग पुणे शहरात गेल्यापासून म्हणावा
आंबेगाव बुद्रुक : पुणे महानगरपालिकेच्या विकासनिधीतून नगरसेवक युवराज बेलदारे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी चव्हाण म्हणाल्या, ‘आंबेगाव पठार हा पुणे महानगरपालिकेतील आविकसित भाग आहे. या भागात बऱ्याच समस्या असून, हा भाग पुणे शहरात गेल्यापासून म्हणावा तेवढा विकास झाला नाही. या भागातील नागरिक, महिला, मुलांच्यासाठी खेळाचे मैदान व्हावे, अशा नागरिकांच्या मागणीनुसार पुणे मनपा यांच्या सहकार्याने व नगरसेवक युवराज बेलदरे पाटील यांच्या कल्पनेतून हा क्रीडा प्रकल्प तयार केला असल्याचे सांगितले. या पुणे मनापा विरोधी पक्ष नेते व पुणेशहरा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष चेतन तुपे माजी महापौर नगरसेवक दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक आप्पा रेणूशे, धनकवडी सहकारनगर प्रभाग क्षेत्रीय अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब धनकवडे. माजी नगरसेवक संतोष फरांदे,नगरसेवक स्मिताताई कोंढरे, नगरसेवक अश्विनी भागवत, युवती आध्यक्ष मनालीताई भिलारे, समिर कुंभार उपस्थित होते.