सहा गावांना ओपन जिमचे साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:03 AM2021-08-02T04:03:28+5:302021-08-02T04:03:28+5:30
मुळशी तालुक्यातील जामगाव, असदे, माले, मुळशी खुर्द, वारक व ताम्हिणी या गावामध्ये ओपन जीम मिळावे, यासाठी असा ठराव व ...
मुळशी तालुक्यातील जामगाव, असदे, माले, मुळशी खुर्द, वारक व ताम्हिणी या गावामध्ये ओपन जीम मिळावे, यासाठी असा ठराव व मागणी पत्र त्या त्या गावातील ग्रामपंचायतीकडून शिवसेनेचे तालुका समन्वयक हनुमंत सुर्वे यांनी मागवून घेतले व तो ठराव आणि मागणी पत्र क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्याकडे जमा करीत तालुक्यातील या गावांमध्ये जिमच्या साहित्याची मागणी केली. संतान यांनीदेखील या गावांच्या मागणीचा विचार करून तत्काळ ओपन जिमचे साहित्य मंजूर केल्याने मुळशी तालुक्यातील या सहाही गावांना ओपन जिमचे साहित्य मिळालेले आहे.
या साहित्यांचा खास करून तरुण वर्गाने फायदा करून घेत नियमितपणे व्यायाम करून आपले शरीर सुदृढ व निरोगी बनवावे याचबरोबर वृद्धांनी देखील याचा फायदा घ्यावा.
मुळशी तालुका शिवसेना समन्वयक, हनुमंत सुर्वे
मुळशी खुर्द येथे ओपन जिमच्या साहित्यांचे रोपण करण्यात आले.