बालक-पालकांसाठी मुक्त व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:10 AM2021-03-06T04:10:05+5:302021-03-06T04:10:05+5:30

पुणे : प्रत्येक विद्यार्थ्यात अर्थात बालकात एक पालक असतो. पालकात शिक्षक आणि प्रत्येक शिक्षकात एक विद्यार्थी; आणि हे तिन्ही ...

Open platform for parents | बालक-पालकांसाठी मुक्त व्यासपीठ

बालक-पालकांसाठी मुक्त व्यासपीठ

googlenewsNext

पुणे : प्रत्येक विद्यार्थ्यात अर्थात बालकात एक पालक असतो. पालकात शिक्षक आणि प्रत्येक शिक्षकात एक विद्यार्थी; आणि हे तिन्ही घटक प्रत्येक घरात कमी जास्त प्रमाणात असतातच. या तिघांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्न ‘बालक-पालक’ या मुक्त व्यासपीठाच्या निमित्ताने नुकताच झाला.

या उपक्रमाचे स्वागत आठ हजार विद्यार्थ्यांनी केले. या विद्यार्थ्यांना अनुभव घेत, संवाद साधत व्यावहारिक शिक्षणाचा आनंद आणि तोही घरबसल्या घेता यावा, यासाठी कार्यशाळा, संवादसत्रे, कृतिसत्रे, व्याख्याने आणि मुलांसाठी वैविध्यपूर्ण स्पर्धा आयोजित करून संवादातून सुसंवाद ऑनलाइन पद्धतीने साधण्याच्या प्रयत्न झाला, अशी माहिती विनायक जोशी यांनी दिली.

जोशी म्हणाले की, याला थोडे व्यापक स्वरूप देण्याचा विचार पुढे आला आणि बालक-पालक फाउंडेशन या सेवाभावी सामाजिक संस्थेची नुकतीच नोंदणीकृत स्थापना झाली. खरंतर करण्यासारखं खूप आहे, करावं तितकं कमीच आहे पण वर म्हटल्याप्रमाणे पालक-विद्यार्थी-शिक्षक या पैकी कोणत्याही भूमिकेतून आपण एकमेकांना या व्यासपीठाद्वारे व्यापक स्तरावर जोडलेले राहावे अशी संस्थेची इच्छा आहे, असे जोशी म्हणाले. यात सुसूत्रता असावी यासाठी विनामूल्य ऑनलाइन नावनोंदणी संस्थेकडे करता येईल. बालक-पालक फाउंडेशनमध्ये आपल्या क्षमतेनुसार-आवडीनुसार-सोयीनुसार सक्रिय होण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

Web Title: Open platform for parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.