गुटख्याची खुलेआम विक्री, ग्रामीण भागात दारूविक्रीही राजरोसपणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:32 PM2018-12-16T23:32:10+5:302018-12-16T23:33:02+5:30
खेड तालुक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामीण भागात दारूविक्रीही राजरोसपणे सुरू
दावडी : तालुक्यासह ग्रामीण भागात मटका, गुटख्याची व अवैध दारूची खुलेआमपणे विक्री होत असल्याने संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे. तालुक्यात मटक्याच्या बुकी जोरात चालू असून जवळपास सर्वच पानटपºया सोबतच शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय परिसरात खुलेआम गुटखाविक्री होत आहे.
शासनाने गुटख्यावर पूर्णत: बंदी आणली असतानाही शहरात सुरू असलेल्या गुटख्यामुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात आली आहे. बाहेरून चोरट्या मार्गाने गुटख्याची आयात होत असून यात अनेक टोळ्या कार्यरत आहेत. गुटखाबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. मात्र, हे अधिकारी कधी येतात व कधी परत जातात, याची माहिती कोणालाही नसते. बाहेरील शहरांतून मोठ्या प्रमाणात गुटखा राजगुरुनगर शहरात दाखल होतो. हे गुटखामाफिया प्रशासनातील अधिकारी व कर्मचाºयांना हाताशी धरून धंदा पसरवत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात काम नाही, शेतकरी-शेतमजुरांना पैसे कमावण्याचे आमिष दाखवून जुगार व मटकाचालक ग्रामीण भागातून येणाºयांना आकर्षित करत आहे. यामध्ये तरुणांसह व ज्येष्ठांचाही नागरिकांचा समावेश असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
पोलीस ठाण्यापासून काहीच अंतरावर असलेल्या या मटका अड्ड्याची पोलिसांना माहितीच नाही, असे म्हणणे म्हणजे हास्यास्पद ठरेल. पोलिसांच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे. आता वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन मटक्याच्या आहारी जाणाºया तरुणाईची सुटका करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पोलीस उपविभागीय खेड अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी वंदना रूपनवर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
४खेड तालुक्यात मटका गेल्या काही दिवसांपासून लपूनछपून चालू आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाºया मटक्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. एवढेच काय पोलीस उपविभागीय कार्यालगतच २० फुट अंतरावर तसेच कार्यालयासमोरच शंभर फुट अंतरावर गुटखा विक्री होत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. मागील महिन्यात पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने पाबळ रोड येथे एका गोडाऊनवरती छापा मारून १ लाख ८० हजारांचा गुटखा जप्त केला होता. मात्र, पुन्हा शहरात व ग्रामीण भागात टपºयांवर खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे चित्र आहे. तालुक्याच्या अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांचे ठिकाण हेरून मटकाकिंग ने आपले व्यवसाय थाटले आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंदे चांगलेच तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे.