जळगाव येथे सील केलेले कार्यालय उघडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:51+5:302021-01-14T04:10:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी जळगाव येथील सील केलेली कार्यालये उघडण्याचे ...

Open a sealed office at Jalgaon | जळगाव येथे सील केलेले कार्यालय उघडा

जळगाव येथे सील केलेले कार्यालय उघडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी जळगाव येथील सील केलेली कार्यालये उघडण्याचे आदेश न्यायालयाने पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.

पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात बीएचआर प्रकरणात आर्थिक घोटाळ्यासंबंधी गुन्हा दाखल झाला होता. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव येथे २७, नोव्हेंबर रोजी छापे टाकले होते. यावेळी खानदेश मिल कॉम्प्लेक्‍समधील शॉप क्रमांक ४२ आणि ४३ येथील कार्यालयाची झडती घेऊन काही हार्डडिक्‍स जप्त केल्या होत्या. तसेच हे दोन कार्यालय सील केली होती. या प्रकरणी ७ अर्जदारांच्या वतीने अँड. रामेश्वर तोतला, राहुल तोतला यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून ही कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. गेल्या दीड महिन्यापासून ही कार्यालय बंद असून त्यामुळे नुकसान होत आहे. या कार्यालयांचा गुन्ह्याशी संबंध नाही, असा युक्तिवाद ॲड. तोतला यांनी न्यायालयात केला होता. तसेच, ही कार्यालय उघडताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. त्याबरोबरच या ठिकाणाहून जप्त केलेल्या हार्डडिस्कची एक कॉपी अर्जदारांना द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना कार्यालयाचे सील उघडावे आणि जप्त केलेल्या हार्डडिक्‍सची एक प्रत अर्जदारांना द्यावी, असा आदेश दिल्याची माहिती ॲड. तोतला यांनी दिली आहे.

Web Title: Open a sealed office at Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.