बीआरटी बसथांब्याचे दरवाजे उघडेच , पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:15 AM2018-04-03T04:15:38+5:302018-04-03T04:15:38+5:30

बीआरटी मार्गातील बसस्टॉपचे दरवाजे, बस आल्यानंतर उघडणे अपेक्षित असताना संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटी मार्गातील अनेक बसस्टॉपचे दरवाजे उघडेच ठेवले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बस आल्यानंतर गर्दीत एखाद्याचा धक्का लागून प्रवाशाचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 Opening of BRT Bastion, the PMP administration ignored | बीआरटी बसथांब्याचे दरवाजे उघडेच , पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष

बीआरटी बसथांब्याचे दरवाजे उघडेच , पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष

Next

पुणे : बीआरटी मार्गातील बसस्टॉपचे दरवाजे, बस आल्यानंतर उघडणे अपेक्षित असताना संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटी मार्गातील अनेक बसस्टॉपचे दरवाजे उघडेच ठेवले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बस आल्यानंतर गर्दीत एखाद्याचा धक्का लागून प्रवाशाचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शहरात जलद वाहतुकीसाठी बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट अर्थात बीआरटी मार्ग सुरू करण्यात आले. मात्र सुरुवातीपासूनच या मार्गात अनेक अडचणी निर्माण झाल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.
बीआरटी मार्गावरील बसस्टॉप हे रस्त्याच्या मधोमध तयार करण्यात आले आहेत. या बसस्टॉपला बसविण्यात आलेले काचेचे दार हे बस दरवाजासमोर आल्यानंतर आपोआप उघडते. यासाठी तेथे सेन्सर बसविण्यात आले आहेत. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावरील साठे बिस्किट, मेंटल कार्नर या बसस्टॉपचे दरवाजे हे उघडेच ठेवले जात असल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती इतर मार्गावरील बसस्थांब्यांची आहे.
कुठली बस ही बसस्थानकात येत आहे, यासाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात आले आहे. तेथे बस येत असल्याचे प्रवाशांना कळते. अनेकदा हे एलईडी स्क्रीन बंद असतात किंवा जीपीएस यंत्रणेत बिघाड असल्यास अथवा बसमधील ही यंत्रणा बंद करून ठेवली असल्यास प्रवाशांना कुठली बस येत असल्याचे कळत नाही.

अशातच अनेक प्रवासी हे या दरवाज्यांमधून वाकून बघत असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. तसेच सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने बस आल्यावर बसचा धक्का लागून एखाद्याचा प्राण जाऊ शकतो. त्याचबरोबर अनेक बसस्टॉपच्या दरवाज्यांना तडा गेला असल्याने ते केव्हा दुरुस्त करणार, असा प्रश्न आता प्रवासी विचारतात.
याबाबत पीएमपीचे सहव्यवस्थापक अजय चारठाणकर म्हणाले, की बीआरटी बसस्टॉपच्या दरवाजांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. काही दरवाज्यांना तडा गेला आहे. हे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे दुरुस्तीचे काम होऊ शकले नव्हते. आता बसस्टॉप देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम होणार आहे.

बसथांब्याचे धानोरीत विद्रुपीकरण

धानोरी : पुणे शहरासह उपनगरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे मुख्य साधन असलेल्या पीएमपीच्या बसथांब्यावर सर्रासपणे अतिक्रमण करून लावलेल्या अनधिकृत जाहिरातींमुळे बसथांब्याचे व परिणामी शहराचेही विद्रुपीकरण होत आहे. धानोरी परिसरातही अशीच परिस्थिती असून अनधिकृत जाहिरातींवर पालिकेने कारवाई करण्याची नागरिक मागणी करीत आहेत.
धानोरीत सगळीकडच्याच बसथांब्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती लावलेल्या दिसून येतात. यामध्ये सिनेमा, सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रम, ‘प्लॉटिंग’ इत्यादी जाहिराती मोठ्या प्रमाणात असतात. यातील काही जाहिराती नागरिकांना मनस्ताप देणाºयाही असतात. बºयाच ठिकाणी बसथांब्यावर अश्लील चित्रपटाच्या जाहिरातीही लावलेल्या दिसून येतात. अशा अश्लील जाहिरातीमुळे पीएमपीने प्रवास करणाºया विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो, असे स्थानिक नागरिक दिलीप डाळिंबकर यांनी सांगितले.
पुणे शहरात सर्वांना सोयीची व परवडणारी पीएमपीची बससेवा आहे. मात्र बसथांब्यावर लावलेल्या अश्लील जाहिरातीमुळे आबालवृद्ध व स्त्रियांना मानसिक त्रास
होतो. भारतातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणचे विद्रुपीकरण सुजाण पुणेकरांना मानसिक वेदना देणारे आहे. तरी संबंधितांनी यावर त्वरित लक्ष देऊन पीएमपी बसथांब्यासारख्या सार्वजनिक ठिकाणचे विद्रुपीकरण थांबवावे.
 

Web Title:  Opening of BRT Bastion, the PMP administration ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.