नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:46+5:302021-07-12T04:07:46+5:30

या वेळी बोलताना आमदार अतुल बेनके यांनी रूढी व परंपरा जोपासताना आरोग्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या आरोग्य शिबिरांना प्राधान्य देण्याची ...

Opening of eye examination and cataract surgery camp | नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन

नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन

Next

या वेळी बोलताना आमदार अतुल बेनके यांनी रूढी व परंपरा जोपासताना आरोग्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या आरोग्य शिबिरांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगितले.

स्व. गुलाबराव एकनाथ तांबे यांच्या स्मरणार्थ डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन व विनायक तांबे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिरामध्ये १५० रुग्णांनी लाभ घेतला. पैकी २५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नारायणगाव येथे पाठवण्यात आले. या वेळी आमदार अतुल बेनके, सागर कोल्हे, पं. स. सभापती विशाल तांबे, जि. प. सदस्य मोहित ढमाले, शरद सहकारी बँकेचे संचालक विनायक तांबे, सरपंच गीताताई पानसरे, उपसरपंच प्रेमानंद अस्वार, उद्योजक जालिंदर पानसरे, ह.भ.प. गंगाराम डुंबरे,वैभव तांबे,संतोष तांबे,सुदाम घोलप,अनिल तांबे,प्रशांत डुंबरे,जयप्रकाश डुंबरे,श्रीकांत थोरात,संदेश एरंडेे, जनार्दन खामकर,शांताराम वारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे उपस्थित होते.या वेळी भास्कर डुंबरे यांनी आभार मानले .

नेत्रतपासणी उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार अतुल बेनके व नेत्रतपासणीसाठी आलेले नेत्ररुग्ण.

Web Title: Opening of eye examination and cataract surgery camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.