रेशनिंग धान्याचा काळाबाजार उघड
By Admin | Published: December 20, 2015 02:29 AM2015-12-20T02:29:19+5:302015-12-20T02:29:19+5:30
शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने बालाजीनगर आणि जनता वसाहत येथील स्वस्त धान्य दुकानांतच टाकलेल्या छाप्यामध्ये रेशनिंगचे धान्य खुल्या बाजारात विक्रीसाठी जात
पुणे : शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने बालाजीनगर आणि जनता वसाहत येथील स्वस्त धान्य दुकानांतच टाकलेल्या छाप्यामध्ये रेशनिंगचे धान्य खुल्या बाजारात विक्रीसाठी जात असताना तब्बल १६८ क्विंटल गहू आणि ७९ क्विंटल तांदूळ जाप्त करण्यात आला. तसेच, एक हजार लिटर केरोसीनचीदेखील काळ्याबाजाराने विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी सांगितले.
शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले परवाने भाड्याने दिले असून, ही दुकाने दुसराच व्यक्ती चालवत असल्याचे समोर आले आहे. बालाजीनगर येथील स्वस्त धान्य दुकानदार एम. एल. नवघणे यांच्या दुकानावर छापा टाकला असता हे दुकान खिमसिंग राजपुरोहीत चालवित असल्याचे स्पष्ट झाले. या छाप्यामध्ये दुकानामध्ये असलेले ५२ क्विंटल तांदुळ व १३३ क्विंटल गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी वेगळ््या पोत्यांमध्ये भरण्यात आल्याचे उघडकीस आले. याशिवाय जनता वसाहत येथे देखील गुप्ता यांचे स्वस्तधान्य दुकान खिमसिंग राजपुरोहीत हाच चालवत असल्याचे समोर आले. (प्रतिनिधी)