राहू येथे कोविड आयसोलेशन सेंटर कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:10 AM2021-05-10T04:10:59+5:302021-05-10T04:10:59+5:30

राहू येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावा, अशी राहूबेट परिसरातील नागरिकांची मागणी होत होती. आमदार राहुल कुल यांनी यासाठी ...

Operated Kovid Isolation Center at Rahu | राहू येथे कोविड आयसोलेशन सेंटर कार्यान्वित

राहू येथे कोविड आयसोलेशन सेंटर कार्यान्वित

Next

राहू येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावा, अशी राहूबेट परिसरातील नागरिकांची मागणी होत होती. आमदार राहुल कुल यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

परिसरातील गावांसाठी राहू हे मध्यवर्ती, तसेच दौंड तालुक्यातील शेती व व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे येथे कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. सौम्य स्वरुपात लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी ५० बेडचे कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले. संपूर्ण गावाने एकत्र येऊन कोरोनावर मात करण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये वर्गणी स्वरुपात लोकनिधी जमा केल्यामुळे राहू परिसरात विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.त्यासाठी खास करून युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रुग्णांची कोविड चाचणी, औषधोपचार, स्वच्छता, साफसफाई आणि कडक बंदोबस्तासाठी हा लोकनिधी वापरला जाणार आहे.

राहू व परिसर रुग्णांकरिता विनामूल्य कोरोनामुक्त करणे हे एकमेव धोरण ठेवून ही व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी सेंटरची जबाबदारी घेतली आहे.

या वेळी राहू गावचे सरपंच दिलीप देशमुख, भीमा-पाटसचे संचालक आबासाहेब खळदकर, यवतचे उपसरपंच सुभाष यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली संपते, पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

युवकांचे शंभर टक्के योगदान

कोविड आयसोलेशन सेंटरची सुरुवात करताना अगदी लोकवर्गणी गोळा करण्यापासून संपूर्ण शाळेची पाणी मारून स्वच्छता, बेडचे नियोजन, लाईटचे व्यवस्थापन पिण्याचे पाणी अशा प्रकारच्या कामात स्वतः राबून गावातील प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते अहोरात्र झटत असून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

Web Title: Operated Kovid Isolation Center at Rahu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.