‘तालेरा’त आॅपरेशन थिएटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:53 AM2018-08-30T00:53:58+5:302018-08-30T00:54:19+5:30
रुग्णांची सोय : इतर रुग्णालयात जाण्याची धावपळ थांबली
पिंपरी : चिंचवड येथील तानाजीनगरमध्ये सुसज्ज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (तालेरा) रुग्णालयात आॅपरेशन थिएटरची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. लोकमतमध्ये ‘आॅपरेशन थिएटरअभावी होतेय गैरसोय’ या मथळ्याखाली ५ आॅगस्टला वृत्त प्रसिद्ध झाले होते. तालेरा रुग्णालयातील गैरसोय मांडण्यात आली होती. तालेरा रुग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र या रुग्णालयामध्ये आॅपरेशन थिएटर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती.
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर येथील रुग्णालयात आठ दिवसांपूर्वी सुसज्ज आॅपरेशन थिएटर सुरू केले आहे. तांत्रिक कारणांमुळे शस्त्रक्रिया विभाग बंद करण्यात आला होता. आता शस्त्रक्रिया विभाग कार्यान्वित झाल्याने कुटुंबकल्याण योजनेंतर्गत येणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व प्रसूतिदरम्यान करावे लागणारे सिझर येथे होणार आहे. लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने दखल घेत रुग्णालयात आॅपरेशन थिएटर सुरू केले आहे. काही तांत्रिक कारणांमुळे शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्यात आला होता. मागील आठ दिवसांपूर्वी येथे सुसज्ज असे आॅपरेशन थिएटर सुरू केले आहे. त्यामध्ये महिलांशी निगडित असलेल्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यामुळे खासकरून महिला रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्याची वेळ येणार नाही. - डॉ. वीणादेवी गंभीर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी