इंदापूरात भुईमुगाच्या शेतात अफुची लागवड; १ हजार १३५ झाडांसह ३२ किलो ग्रॅम अफुची बोंडे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 08:13 PM2022-03-03T20:13:33+5:302022-03-03T20:13:46+5:30

वरकुटे बु. (ता.इंदापूर) येथे भुईमगाच्या व लसण्याच्या पिकामध्ये दोन शेतकऱ्यांनी अफुची बेकायदेशीर लागवड केली

Opium cultivation in groundnut fields in Indapur 32 kg of opium bonds seized along with 1000 trees | इंदापूरात भुईमुगाच्या शेतात अफुची लागवड; १ हजार १३५ झाडांसह ३२ किलो ग्रॅम अफुची बोंडे जप्त

इंदापूरात भुईमुगाच्या शेतात अफुची लागवड; १ हजार १३५ झाडांसह ३२ किलो ग्रॅम अफुची बोंडे जप्त

Next

इंदापूर : वरकुटे बु. (ता.इंदापूर) येथे भुईमगाच्या व लसण्याच्या पिकामध्ये दोन शेतकऱ्यांनी अफुची बेकायदेशीर लागवड केली. इंदापुर पोलिसांनी धाड टाकत या प्रकरणी दोन शेतकऱ्यांना अटक केली. यासोबतच १ हजार १३५ अफुची झाडे आणि ३२ किलो अफुची बोंडे जप्त केले. बुधवारी (दि २) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. आरोपी फरार आहेत.

या प्रकरणी पांडुरंग नामदेव कुंभार, नवनाथ गणपत शिंदे या दोन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र जयवंत वाघ (वय ४३) यांनी या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग नामदेव कुंभार यांच्या गट नं.२४ व नवनाथ गणपत शिंदे यांच्या भुईमुग आणि लसण्याच्या पिकामध्ये चक्क आंतरपिक म्हणुन अफु या अंमली पदार्थाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केली. ही बाब पोलीसांना कळाली. इंदापुर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता शेतावर धाड टाकली. यावेळी भुईमुग आणि अफूच्या शेतात अफुच्या झाडांची लागवड केलेली दिसली. जवळपास १ हजार १३५ झाडे शेतात लावली होती. या झाडांना ३२ कीलो वजनांची बोंडे होती. त्याची तोड शेतकऱ्यांनी केली होती. हा सर्व माल पोलिसांनी जप्त केला. या मालाची बाजारपेठेतील किंमत ही २ लाख ३० हजार ५५० रूपये आहे. पोलिसांनी अंमली पदार्थ औषधीद्रव्य व मन प्रभावी पदार्थ कायद्यानूसार गुन्हे दाखल केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील हे करत आहेत.

Web Title: Opium cultivation in groundnut fields in Indapur 32 kg of opium bonds seized along with 1000 trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.