Pune | बंदी असतानाही पुणे जिल्ह्यात अफूची शेती; शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 08:58 PM2023-02-20T20:58:41+5:302023-02-20T20:59:09+5:30

बंदी असतानाही अफू पिकाची शेती केल्याचे समोर....

Opium cultivation in Pune district despite ban; A case has been registered against the farmer | Pune | बंदी असतानाही पुणे जिल्ह्यात अफूची शेती; शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Pune | बंदी असतानाही पुणे जिल्ह्यात अफूची शेती; शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

राजगुरूनगर (पुणे) : थिगळस्थळ (ता. खेड ) बंदी असतानाही अफू पिकाची शेती केल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याने आपल्या शेतात अफू पिकवली. पण पोलिसांना याचा सुगावा लागलाच. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी छापा मारून अंदाजे एक लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली. आरोपी सुभाष  गुलाब थिगळे (रा. थिगळस्थळ, राजगुरुनगर, ता. खेड ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली.

राजगुरुनगर शहरालगत थिगळस्थळ येथे चासकमान धरणाच्या कालव्यालगत ही अफूची शेती केली होती. वस्तीपासून जवळच असलेल्या शेतात थिगळे याने अफूची लागवड केली होती. पीकही जोमात आले होते. मात्र, खेड पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून त्यांनी छापा घालण्याचे नियोजन केले.

पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार शंकर भवारी, संतोष घोलप, संतोष मोरे, प्रविण गेंगजे व महसूल कर्मचारी यांनी सोमवार (दि. २०) दुपारी तेथे छापा मारला. थिगळे यांच्या शेतात कांदा व लसून या पिकांत आंतरपिक म्हणून अफु पिकाची झाडे मिळून आली. शेतातून ६१ किलो वजनाची झाडे जप्त करण्यात आली. बोंडे आल्याच्या अवस्थेत हे पीक होते. अंदाजे त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये असून पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती जप्त केली.

Web Title: Opium cultivation in Pune district despite ban; A case has been registered against the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.