‘समान पाणी’वरून विरोधकांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:43 AM2017-08-05T03:43:59+5:302017-08-05T03:43:59+5:30
समान पाणी योजनेच्या कामासाठी म्हणून कर्ज काढलेले २०० कोटी रुपये विनावापर पडून राहणार असल्याने महापालिकेतील विरोधकांनी आता ते पैसे मुदत ठेवीत टाकण्याची मागणी केली आहे.
पुणे : समान पाणी योजनेच्या कामासाठी म्हणून कर्ज काढलेले २०० कोटी रुपये विनावापर पडून राहणार असल्याने महापालिकेतील विरोधकांनी आता ते पैसे मुदत ठेवीत टाकण्याची मागणी केली आहे. या सर्व घाईला प्रशासनाइतकेच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांचा बेजबाबदारपणाही कारणीभूत असल्याची टीका करण्यात आली.
काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांनी या प्रकरणात महापालिकेचे तुमच्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, अशी टीका करणारे पत्र लिहून ते गुलाबाच्या फुलासह आयुक्त व लेखापाल यांच्याकडे दररोज देण्यास सुरुवात केली आहे. सजग नागरिक मंचाच्या वतीने अध्यक्ष विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी कर्जरोखे काढण्याची घाई करणाºया अधिकाºयांना यात जबाबदार धरावे, अशी मागणी राज्य सरकारकडे
केली आहे.