संरक्षण आणि सामरिकशास्त्रातील संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:46+5:302021-04-22T04:09:46+5:30

जागतिक पातळीवर दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषत: अमेरिकेत या विषयाला अधिक महत्त्व दिले गेले. त्याची परिणिती म्हणजे आता अमेरिकेत विविध नावाजलेले ...

Opportunities in defense and tactics | संरक्षण आणि सामरिकशास्त्रातील संधी

संरक्षण आणि सामरिकशास्त्रातील संधी

Next

जागतिक पातळीवर दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषत: अमेरिकेत या विषयाला अधिक महत्त्व दिले गेले. त्याची परिणिती म्हणजे आता अमेरिकेत विविध नावाजलेले थिंक टॅंक, संस्था व सामरिक विषयांवर कार्यरत आहेत. त्याचाच परिणाम आपणास भारतातही पहावयास मिळतो. आज भारतात एमपी, आयडीएसए मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा नवी दिल्ली, ओआरएफ ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन (डी.पी.जी.) दिल्ली पाॅलिसी ग्रुप, नवी दिल्ली, सीपीसीआर सेंटर फाॅर स्ट्रेटजिक स्टडीज, सेंटर फाॅर फॅसिटी रिसर्च, नॅशनल डिफेन्स काॅलेज नवी दिल्ली, एनआयएएस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्समधील व इतर संस्था राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून भारतात राष्ट्रीय सुटकेबाबत सर्वदूर चर्चा होऊन शांतता कालखंडात व युद्ध कालखंडात संघर्ष निवारण आणि त्याचे व्यवस्थापन याबाबत ध्येयधोरणे आखली जातात. त्यामुळे जे विद्यार्थी एम.ए./एम.एस्सी. संस्था आणि सामाजिक शास्त्र विषयात पारंगत होतात. ते पुढे या राष्ट्रीय संस्थेत संशोधक धोरण ठरविणारे अधिकारी म्हणून कार्यरत होऊ शकतात. तसेच विविध राष्ट्रीय आणि आंंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियामध्ये या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते.

अभ्यासक्रम कोणते?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १९६२ च्या युद्धानंतर हा विषय शिकवण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला लष्करी इतिहास, नंतर ‘संरक्षणशास्त्र’ व आता संस्था आणि सामारिकशास्त्र या विषयात एम. एस./एम.एसी. पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जात आहे. तसेच २०१७ पासून विद्यापीठाने अभ्यासक्रमात बदल केले. आता विभागात प्रथमच इयत्ता बारावीनंतर पाच वर्षांचा एकत्रित एम. एस./एम.एससी. हा नवा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अशा पद्धतीचा संरक्षण आणि सामरिकशास्त्रातील भारतातील हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींना बरावीनंतर लष्करात जाण्याची संधी मिळाली नाही. त्यांना बीए/बी.एसी. करून (सीडीएस) Combined Defence Service च्या परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून तयारी करण्यात येते. तसेच ज्यांना पुढे थिंक टॅंकमध्ये संशोधक व्हायचे आहे. ते पुढे एम. एम./एम. एससी करू शकतात. भारत सरकारने नवीन मेक इन इंडिया व आत्मनिर्भर धोरणांची अंमलबजावणी केली आहे. त्याद्वारे खासगी क्षेत्रात विविध तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्या युवकांची गरज भासणार आहे. त्यामुळे डीआरडीओच्या संदर्भातील (Defence Tectrories ) संरक्षण तंत्रज्ञान या विषयावरचा नवीन अभ्यासक्रम विभागाने तयार केला आहे. तसेच भारतीय समुद्रातील विविध खनिजे, नैसर्गिक स्त्रोत व त्यांचे सामरिक महत्त्व या विषयावरही विभागात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा करिअरसाठी चांगलाच फायदा होणार आहे.

विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रबांधणीसाठीचे महत्त्व असा एक नावीन्यपूर्ण एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला केलेला आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन व राष्ट्रीय सुरक्षा’, प्रतिदहशतवादाचे धोरण, सायबर सुरक्षा व राष्ट्रीय सुरक्षा दक्षिण व पश्चिम आशिया व सुरक्षा, रासायनिक, शांतता आणि सुरक्षा, युरोपियन शांतता आणि सुरक्षा अशी नऊ वेगवेगळे पी. जी. डिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. संरक्षण आणि सामाजिक शास्त्रात सर्व पैलूंचा अभ्यास पुणे विद्यापीठात केला जात आहे. त्यातून विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातही प्रामुख्याने जे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करतात त्यांना जनरल स्टडीज व आंतरराष्ट्रीय संबंध या दोन पेपरचा अभ्यास विद्यापीठातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सोपा जाऊ शकतो.

- डाॅ. विजय खरे, विभागप्रमुख, संरक्षण व सामरिकशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Opportunities in defense and tactics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.