शैक्षणिक संधीचे पर्याय खुले

By admin | Published: June 1, 2017 02:12 AM2017-06-01T02:12:08+5:302017-06-01T02:12:08+5:30

‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१७ ’ला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवसांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने

Opportunities for educational opportunities open | शैक्षणिक संधीचे पर्याय खुले

शैक्षणिक संधीचे पर्याय खुले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१७ ’ला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवसांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ‘या प्रदर्शनातून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहे,’ असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

एकाच ठिकाणी शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध होण्याची संधी लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून उपलबध झाली आहे. डिजिटल युगात सर्व प्रकारची माहिती जरी इंटरनेटवर मिळत असली तरी प्रत्यक्ष त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून मिळणारे मार्गदर्शन महत्वाचे असते. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यकतींना अनेक वर्षांचा अनुभव असतो. या क्षेत्रात होणारे बदल, आगामी काळातील आव्हाने याविषयीचे योग्य मार्गदर्शन मिळण्याची संधी प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत असते. तज्ज्ञ व्यकतींची मार्गदर्शन शिबीरे यानिमित्ताने आयोजित केली जातात. त्यातून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे या प्रदर्शनाचा विद्यार्थी, पालकांनी लाभ घेणे महत्वाचे ठरणारे आहे.
- संदीप पाचपांडे, संस्थापक, एएसएम ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट

आजच्या इंटरनेटच्या काळात तंत्रज्ञानाने प्रगत होत असताना, व्यकतीगत संबंधही महत्वाचे आहेत. लोकमतने आयोजित केलेल्या एज्युकेशन फेअरमध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था सहभागी होतात. या संस्थांचे प्रतिनिधी थेट विद्यार्थी, पालकांशी संवाद साधतात. एकाच छताखाली विविध शैक्षणिक संस्थांची दालने उपलब्ध होत असल्याने शिक्षणाच्या संधी आणि करिअरचे विविध पर्याय निवडणे विद्यार्थ्यांंना सुलभ होते. - दीपक शहा, संस्थापक,
प्रतिभा ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट

विविध अभ्यासक्रमांसाठी आता प्रवेश परिक्षा अनिवार्य झाल्या आहेत. सीईटी व अन्य प्रवेश परिक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. त्यांना याबाबत माहिती मिळते, परंतू त्यात स्पष्टता नसते. त्यामुळे लोकमतने आयोजित केलेल्या अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर सारखी प्रदर्शने त्यांना उपयुक्त ठरतात. त्यांना प्रवेश परिक्षेची तयारी कशी करावी येथपासून ते नेमका कोणता अभ्यासक्रम निवडावा हे कळते. - डॉ. राजेंद्र कानफाडे, प्राचार्य,
नूतन इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकल कॉलेज

दहावी व बारावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नेमका कोणता अभ्यासक़्रम निवडावा, कोणत्या विद्या शाखेतून शिक्षण घ्यावे, कोणत्या व्यवसायिक अभ्याक्रमाला महत्व आहे. विद्यार्थी, पालकांच्या मनातील या सर्व शंका दूर करण्यास लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन प्रदर्शन मार्गदर्शक असे आहे. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन त्याने कोणता अभ्यासक्रम निवडावा, याचे अनेक पर्याय उपलब्ध होत असल्याने लोकमतच्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना फायदा होतो. अशा प्रकारचे हे शैक्षणिक प्रदर्शन ही काळाची गरज आहे.
- गिरीश देसाई, कार्यकारी संचालक,
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, आकुर्डी

Web Title: Opportunities for educational opportunities open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.