अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी - डॉ. दीपक केळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:11 AM2019-03-20T02:11:53+5:302019-03-20T02:12:11+5:30

अपारंपरिक ऊर्जेच्या स्रोतांची उपलब्धी भारतात मोठ्या प्रमाणात आहे. आता विजेवर चालणाऱ्या गाड्या, अनेक सौर प्रकल्प येत आहेत.

 Opportunities for Non-Conventional Energy Generation - Dr. Deepak Kelkar | अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी - डॉ. दीपक केळकर

अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी - डॉ. दीपक केळकर

Next

कोंढवा : अपारंपरिक ऊर्जेच्या स्रोतांची उपलब्धी भारतात मोठ्या प्रमाणात आहे. आता विजेवर चालणाऱ्या गाड्या, अनेक सौर प्रकल्प येत आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि उपयोजित संशोधन केले, तर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन इशा सोलरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक केळकर यांनी केले.
येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने अपारंपरिक ऊर्जा या विषयावर आयोजित दोन दिवसीय
आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. केळकर बोलत होते.
विप्रोचे सरव्यवस्थापक सतीश रानडे, डॉ. रश्मी वाळवेकर, केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक कल्याण जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, संचालक (कॅम्पस) डॉ. व्यासराज काखंडकी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, यंत्र अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. भरत शिंदे आदी
उपस्थित होते. या परिषदेत आंतराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांनी अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रातील आधुनिक संशोधन व संधींविषयी मार्गदर्शन केले. उद्योग व शिक्षण क्षेत्रांत
समन्वय साधण्याच्या उद्देशाने
ही परिषद आयोजिली होती.
दहाहून अधिक विविध देशातील संशोधकांनी आपले प्रबंध सादर केले. डॉ.एस. ए.काळे यांनी यशस्वी संयोजन केले.

Web Title:  Opportunities for Non-Conventional Energy Generation - Dr. Deepak Kelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे